महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी काढली 10 किलोची गाठ, डॉक्टरांनी अवघड शस्रक्रिया करुन वाचविले प्राण
एका महिलेच्या पोटातून दहा किलोची मांसल गाठ काढण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश मिळाले आहे. दोन तास चाललेल्या या शस्रक्रियेमुळे या महिलेला जीवनदान मिळाले आहे.
ठाणे |1 फेब्रुवारी 2024 : ठाणे येथील सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका अवघड शस्रक्रियेद्वारे एका महिलेचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. सिव्हील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून तब्बल दहा किलोचा ट्युमर काढाला आहे. या मांसाचा गोळा पाण्याने भरलेला होता. डॉक्टरांचे ऑपरेशन प्रचंड अवघड होते. या ऑपरेशनसाठी डॉक्टरांच्या पथकाला दोन तास लागले. या महिलेच्या पोटातील एवढी मोठी गाठ निघाल्यानंतर तिला आता हायसे वाटत असून तिने डॉक्टरांचे आभार मानले आहे.
वेदनेने त्रस्त होती महिला
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ही महिला रुग्ण उल्हासनगरातीस रहिवासी असून तिचे वय 48 इतके आहे. गेल्या सहा महिन्यात या महिलेला पोट दुखीचा त्रास सुरु होता. परंतू आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने तिने खाजगी रुग्णालयात न जाता. सरकारी रुग्णालयात दाखविले. या महिलेने अनेक दिवस हा त्रास सहन केला. वेदना सहन करण्यापलिकडे गेल्यानंतर तिने ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमधून उपचार सुरु केले.
या महिलेला आधी उल्हासनगरातील एका सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये ही महिला दाखल झाली होती. येथील डॉक्टरांनी 20 जानेवारीला पुढील उपचारासाठी तिला ठाणे येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविले. या महिलेची तपासणी केली तेव्हा भला मोठा ट्युमर पोटात असल्याचे दिसले. या पाण्याने भरलेला मांसल गोळा होता. हॉस्पिटलचे जिल्हा सर्जन डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेचे ऑपरेशन करण्यात आले. तेव्हा तिच्या पोटातून तब्बल दहा किलोची गाठ निघाली. या ऑपरेशनला स्री रोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके यांनी यशस्वीपणे केले. त्यामुळे या महिलेला नवे जीवन मिळाले आहे.
दोन तास चालली सर्जरी
या महिलेच्या गर्भाशयाची सोनोग्राफी केली होती. सीटी स्कॅनमध्ये तिच्या पोटात पाण्याने भरलेली गाठ दिसत होती. ही सर्जरी खूपच अवघड होती. परंतू डॉक्टरांनी अतिशय कौशल्यपूर्वक ही शस्रक्रिया केली. या शस्रक्रियेला दोन तास लागले. या शस्रक्रियेसाठी स्री रोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, एनेस्थेसियोलॉजिस्ट प्रियंका महांगडे आणि अन्य स्टाफने मेहनत घेतली. महिलांच्या शरीरातीस काही बदलांमुळे गाठ निर्माण होते. त्यामुळे पोटात दुखणे, अपचन, नैसर्गिक क्रिया करण्यात अडचणी येतात. कधी-कधी ही गाठ कॅन्सरची देखील असू शकते. त्यामुळे या ट्युमरची तपासणी केली जाणार असल्याचे शैल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी म्हटले आहे.