Corona : जगात पुन्हा दहशत; ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट

कोरोनाने काही काळ दिलासा दिला. त्यानंतर आता चीनमध्ये मोठा हाहाकार माजला आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या XE या नवीन प्रकाराने दरवाजा ठोठावून चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Corona : जगात पुन्हा दहशत; ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट
कोल्हापूरात कोरोनाचे रुग्ण Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 1:23 AM

लंडन : कोरोना महामारीतून जग कधी सावरणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनमध्ये नव्या व्हेरिएंट (New Variant)ने हाहाकार उडवला आहे. एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे, त्यात ब्रिटनही नव्या व्हेरिएंटच्या तडाख्यात सापडल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. ओमायक्रोनने पुन्हा धडधड वाढवली आहे. त्यापाठोपाठ कोरोना (Corona) विषाणूच्या XE या नवीन व्हेरिएंटने ब्रिटनमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळे अनेक देश चिंतेत सापडले आहेत. (A new variant of the corona virus XE has raised concerns in Britain)

ओमायक्रोनपेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य; डब्ल्यूएचओचा इशारा

कोरोनाने काही काळ दिलासा दिला. त्यानंतर आता चीनमध्ये मोठा हाहाकार माजला आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या XE या नवीन प्रकाराने दरवाजा ठोठावून चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोरोनाचा ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन प्रकार ओमायक्रोनपेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. चीनसह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची रुग्णसंख्या वाढत आहेत. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने नव्या व्हेरिएंटबाबत सावध केले आहे, ‘जनसत्ता’ने वृत्तात म्हटले आहे.

भारतात अजून परिस्थिती नियंत्रणात

ब्रिटन आणि फ्रान्समध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनले आहे. याचवेळी अजूनतरी भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मास्क न घालण्याबद्दल दंड आकारण्याची कारवाई रद्द करण्यात आली आहे. नियम शिथिल होताच काही राज्यांमध्ये लोक सोशल डिस्टन्सिंगबाबत बेफिकीर वागू लागले आहेत. अशातच नव्या व्हेरिएंटची काही देशांमध्ये एंट्री झाल्याने भारतालाही सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.

ब्रिटनमध्ये पहिल्यांदा 19 जानेवारीला आढळला नवीन XE स्ट्रेन

एका रिपोर्टनुसार, ब्रिटिश हेल्थ सिक्युरिटी एजन्सी म्हणते की सध्या 3 हायब्रिड कोरोना व्हेरिएंट आहेत. यामध्ये डेल्टा आणि BA.1 च्या विलीनीकरणातून XD आणि XF ही दोन रूपे निर्माण झाली आहेत. तिसरा प्रकार XE आहे. जागतिक आरोग्य संघटना XE व्हेरियंटला ओमायक्रोन व्हेरियंटशी जोडण्याचा विचार करत आहे. XE स्ट्रेन पहिल्यांदा ब्रिटनमध्ये 19 जानेवारीला आढळला. तेव्हापासून त्याच्या 500 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. ब्रिटीश एजन्सीचे म्हणणे आहे की सध्या नवीन प्रकाराबद्दल फारसे काही सांगता येणार नाही. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. त्यावर सध्याच्या कोरोना प्रतिबंधक लसी काम करतील की नाही हेदेखील सांगता येणार नाही.

भारतात कोरोनाच्या तीन लाटा धडकल्या. पहिल्या आणि तिसरी लाट तितकी भयंकर नव्हती. मात्र दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना संसर्गामुळे प्राण गमवावा लागला. डेल्टा प्रकारामुळे देशाच्या अनेक भागांत मृत्युदर अधिक नोंद झाला. सध्या भारतात कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आला असून नव्या व्हेरिएंटचा प्रभाव नाही. मात्र सावधगिरीच्या दृष्टिकोनातून भारताला पावले उचलावी लागतील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (A new variant of the corona virus XE has raised concerns in Britain)

इतर बातम्या

Nanded | जिल्ह्यात गावा-गावात आता फिरते एंडोस्कोपी रुग्णालय, कँसरचे लवकर निदान होण्यासाठी उपक्रम

Weight Lose Tips : ‘या’ चार फळांचा आहारात समावेश करा आणि वजन घटवा!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.