अमिताभ बच्चन यांना झाली Rib Cartilage injury, जाणून घ्या किती धोकादायक आहे ही दुखापत ?

Amitabh Bachchan Injury : 'प्रोजेक्ट के ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये यासंदर्भात माहिती देत बरगड्यांना दुखापत झाल्याचे नमूद केले.

अमिताभ बच्चन यांना झाली Rib Cartilage injury, जाणून घ्या किती धोकादायक आहे ही दुखापत ?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 11:05 AM

मुंबई : वयाच्या 80 व्या वर्षीही बॉलिवूडचे शहेनशहा, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सतत चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनेक जुनी दुखणी असूनही ते दृढ निश्चय करून स्वत:ला कामात झोकून देतात. नुकतीच त्यांना हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान मोठी दुखापत (injury)  झाली. ‘प्रोजेक्ट के ‘ या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना बिग बी यांच्या बरगड्यांना (ribs) मोठी दुखापत झाली. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये यासंदर्भात माहिती देत रिब कार्टिलेज पॉप झाल्याचे सांगत बरगड्यांचे स्नायूही ताणले गेल्याचे नमूद केले आहे. सध्या ते घरी असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रिब कार्टिलेज पॉप होणे याचा अर्थ असा की फॉल्स रिब म्हणजेच बरगड्यांशी जोडली गेलेली कार्टिलेट तुटणे, ज्यामुळे बरगडी देखील ताणली जाऊ शकते. वाढत्या वयासोबतच या प्रकारची समस्या अधिक असते. ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रिब कार्टिलेज पॉप हे कोणत्याही दुखापतीमुळेही होऊ शकते. बरगडी त्वचेच्या आत असली तरी वाढत्या वयामुळे हाडेही कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत बरगडीला काही इजा झाल्यास कूर्चा तुटण्याची भीती असते. बर्‍याच प्रकरणांमध्ये, बरगडीला थोडीशी दुखापत झाली तरीही, रिब कार्टिलेज पॉप होण्याची भीती असते. मात्र, दुखापत सौम्य असेल तर रुग्णाला कोणतीही मोठी समस्या येत नाही.

6 ते 8 आठवड्यांचा लागतो कालावधी

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांच्या मते ही गंभीर समस्या नाही. बरगडीला गंभीर दुखापत झाल्यास किंवा बरगडी फ्रॅक्चर असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते, परंतु दुखापत सौम्य असल्यास, बरगडीचा पट्टा (rib belt) घातल्याने ही समस्या आटोक्यात येऊ शकते. या समस्येतून बरे होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागू शकतात. रुग्णाला दुखापत झाल्यानंतर कशी काळजी घेण्यात येते व सेवन करण्यात येणारा आहार, यावरही ते अवलंबून असते.

ब्लॉगच्या माध्यमातून बिग बींनी दिली माहिती

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे या अपघाताची व दुखापतीची माहिती दिली. अमिताभ बच्चन म्हणाले, ‘हैदराबाद याठिकाणी शुटिंग सुरु होती तेव्हा ॲक्शन सीन शुट करत असताना मी जखमी झालो आहे. अपघातानंतर शुटिंग रद्द करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली आणि हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आहे. आता मी घरी परतलो आहे. आता काळजी करण्याचं कारण नाही. पण प्रचंड त्रास झाला. हलण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता…’ असंही बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले.

तसेच ‘ प्रकृती स्थिर होण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदना होत असल्यामुळे डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. त्यामुळे जी कामे आहेत, ती काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहेत. मी आता जलसामध्ये आराम करत आहे. ’ असे अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहीले आहे.

बिग बी यांच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. पण खुद्द बिग बींनी काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे.

कुलीच्या सेटवर झाला होता मोठा अपघात

यापूर्वीही अमिताभ बच्चन यांना मोठी दुखापत झाली होती. 26 जुलै 1982 रोजी ही घटना घडली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन हे कुली या चित्रपटाची शूटिंग करत होते. बेंगळुरूमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. अभिनेते पुनीत इस्सार यांच्या सोबत एका ॲक्शन सीनचं शूटिंग करताना अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ते अनेक दिवस रुग्णालयात होते. बऱ्याच महिन्यानंतर ते दुखापतीतून सावरले. त्या घटनेनं बिग बींच्या कुटुंबीयांसह संपूर्ण देश हादरला होता. लाखो चाहत्यांनी बिग बींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.