पुण्यानंतर राज्यभरात GBS आजाराचे रुग्ण,अस्वच्छ पाण्याचे नमूने गोळा केले, घरोघरी संशयित रुग्णाची तपासणी सुरु

पुण्यात जीबीएस आजाराचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर आता राज्याच्या सर्व ठिकाणी या आजाराचे संशयित रुग्ण सापडत आहेत. हा आजार संसर्गजन्य नसल्याने एका पासून दूसऱ्याला होत नसल्याने चिंता करण्याची काही गरज नसल्याचे आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.

पुण्यानंतर राज्यभरात GBS आजाराचे रुग्ण,अस्वच्छ पाण्याचे नमूने गोळा केले, घरोघरी संशयित रुग्णाची तपासणी सुरु
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 1:18 PM

पुण्यात GBS या विचित्र अतिशय दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर राज्याचे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. या आजारात मृत्यूचा दर अतिशय कमी आहे. तरी या आजारावर ठोस उपचार नसल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या आजाराचे 100हून अधिक संशयित रुग्ण पुण्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत सर्वाधिक 80 रुग्ण तर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत सहा रुग्ण सापडल्याने पुण्यात आणीबाणी निर्माण झाली असताना आता राज्याच्या अन्य भागातही जीबीएस रुग्ण सापडत असल्याने दूषित पाण्याचे नमूने गोळा केले जात आहेत. तसेच घरोघरी रुग्ण शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. या आजाराला महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश खाजगी रुग्णालयांना दिले आहेत.

जीबीएस अर्थात गुलेन-बॅरे सिंड्रोम Guillain-Barré Syndrome (GBS) या आजाराने पुण्यात रविवारी शंभर आकडा गाठला आहे.या आजारावरील उपचारांचा एकत्रित समावेश महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत केला गेला आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालय या आजारावरील उपचार मोफत होत आहेत,अशी माहिती महापालिका आरोग्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे १५ संशयित रुग्ण आढळले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संबंधित आजारावर आवश्यक असणारे औषधोपचार महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह इतर रुग्णालयात उपलब्ध करून दिले आहेत. महापालिकेच्यावतीने आठ रुग्णालयांच्या झोन अंतर्गत एकूण 16 पथकांनी मार्फत घरोघरी वैद्यकीय सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात आज अखेर एकूण 3 हजार 986 घरांची तपासणी केली गेली आहे अशी माहिती वायसीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली आंबिके यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याची उपराजधानी नागपूरात देखील जीबीएस आजाराने डोकेवर काढले आहे. या महिन्यात नागपूर मेडीकल रुग्णालयात दाखल झालेल्या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण विशीच्या आतील मुले -मुली आहेत. पुण्यात ‘जीबीएस’चे रुग्ण 100 च्या वर गेल्याने नागपूर आरोग्य विभाग देखील हाय अलर्टवर गेला आहे. नागपूर मेडीकल रुग्णालयामध्ये 8वर्षे, 17 वर्षे, 19 आणि 40 वयोगटातील रुग्णावर उपचार सुरु आहेत. चारपैकी दोन रुग्णांची प्रकृती बरी असून, एका रुग्णावर उपचार सुरु, तर एक जण गंभीर आहे. नागपूर मेडीकल रुग्णालयात ‘जीबीएस’ रुग्णांवर उपचारासाठी टीम सज्ज असल्याचे नागपूर मेडीकलचे अधिक्षक डॅा. अविनाश गावंडे यांनी सांगितले आहे.

आजार संसर्गजन्य नसल्याने चिंता करु नका

पुण्यानंतर राज्यभरातील अनेक शहरात आता जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण आढळून येत आहेत.कोल्हापुरात देखील या जीबीएस सिंड्रोमचे दोन रुग्ण सापडले आहेत. ज्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण साठ वर्षांचे वृद्ध तर एक सहा वर्षाची बालिका असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली आहे.दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जीबीएस सिंड्रोम आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता या आजारासाठी 70 व्हेंटिलेटर सह आवश्यक औषध साठा सीपीआर रुग्णालयाने सज्ज ठेवला आहे. शिवाय हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही मात्र ते काही दिवस पाणी उकळून पिण्यासह पूर्ण शिजलेलं अन्य खाण्याचं आवाहन सीपीआर रुग्णलयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले आहे.

लोकांनी काळजी घ्यावी

जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण पुण्यामध्ये आढळले आहेत. ज्या ठिकाणी हे रुग्ण आढळले आहेत, त्याठिकाणच्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे.लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे असे आवाहन आरोग्यराज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. बुलढाणा येथील 103 गावातील पाणी दूषि आहे. बुलढाणा जिल्हा हा खारपाण पट्ट्यामध्ये येतो. जवळपास बुलढाणा जिल्ह्यातली 170 पेक्षा गावात क्षारयुक्त पाणी आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणजे मागे किडनीचे पेशंट आढळले होते. ज्या गावात किडनीचे रुग्ण होते, त्याठिकाणी अनेक पाण्याच्या योजना केल्या आहेत आणि त्याठिकाणी शुध्द पाणी सुरू झाले आहे. त्याठिकाणचे जे 103 गावातील पाण्याचे नमुने आलेले आहेत ही गोष्ट खरी असली तरी लोक हे पाणी लोक पिण्यासाठी वापरत नाहीत अशीही माहीती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....