AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आलिया भट्ट’ 29 व्या वर्षी होणार आई, जाणून घ्या, गर्भधारणेसाठी ‘योग्य वय’ कोणतं आणि त्याची कारणं

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. आलिया आणि रणबीर कपूरची कारकीर्द वाढत आहे आणि दोघांनी अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केले आहे. दोघेही वयाच्या बाबतीतही पालक होण्यासाठी योग्य आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे पालक बनल्याची बातमी योग्य वेळी आली आहे. आलिया आणि रणबीरप्रमाणे तुम्हीही कुटुंब नियोजनासाठी अनेक बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे.

‘आलिया भट्ट’ 29 व्या वर्षी होणार आई, जाणून घ्या, गर्भधारणेसाठी ‘योग्य वय’ कोणतं आणि त्याची कारणं
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 7:27 PM

आलिया भट्टने तिच्या लग्नाच्या तिसऱ्या महिन्यातच प्रेग्नन्सी जाहीर (Pregnancy declared) केली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे तीने ही गोड बातमी दिली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या बाळाचा अल्ट्रासाऊंड फोटो पाहून आलिया हसत आहे. तिच्या शेजारी रणबीर कपूरही बसलेला दिसतोय. या जोडप्याचे हे सुंदर छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आलिया भट्ट 29 वर्षांची असून करीअरच्या बाबतीतही ती उंची गाठत आहे. विवाहीत महिलांनी तीशी ओलांडण्यापुर्वीच बाळाचे नियोजन (Baby planning) करावे, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 20 वर्षापूर्वी कोणत्याही महिलेने आई होऊ नये. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील 15-19 वर्षे वयोगटातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण गर्भधारणा आणि बाळंतपण (Pregnancy and childbirth) आहे. जर एखादी स्त्री 20 वर्षांपेक्षा लहान असेल तर तिच्या बाळाचा जन्मानंतर किंवा जन्मादरम्यान मृत्यू होण्याची शक्यता देखील खूप वाढते. करीअर आणि अभ्यासाच्या बाबतीतही एवढ्या लहान वयात मूल होणे योग्य नाही.

20ते 25 व्या वर्षी लग्न झाले असेल तर-

जर वयाच्या वीशीत तुमचे लग्न झाले असेल तर, गर्भधारणेसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या वर्षांमध्ये, स्त्रीची अंडी खूप चांगली असतात आणि पुरुषाचे शुक्राणू देखील गर्भधारणेसाठी सर्वोत्तम स्थितीत असतात. पण या वयातही तुम्ही गर्भधारणेचे नियोजन तेव्हाच केले पाहिजे, जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रकारे तुमच्या मुलाला चांगले भविष्य देण्यास तयार असाल.

25 ते 30 वया दरम्यान असाल तर-

जर तुमचे वय 25 नंतर आणि 30 च्या आधी लग्न झाले असेल तर मुलास अजिबात उशीर करू नये. अनेक जोडप्यांचा असा विश्वास आहे की, मूल होण्यासाठी हे सर्वोत्तम वय आहे कारण या वयात त्यांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केले आहे. ते मुलासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असतात. दरम्यान, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, या वयात महिलांची प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यांची गर्भवती होण्याची शक्यता वर्षभरात एक चतुर्थांश कमी होते. याचा पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. जर पुरुष नियमितपणे दारू पित असेल किंवा धूम्रपान करत असेल, तर त्याच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणखी घसरते. त्यामुळे तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे वय 25-30 वर्षांच्या आत असेल तर तुम्ही मूल होऊ देण्यास उशीर करू नये.

३०-३५ वर्षा दरम्यान लग्न झाले असेल तर-

30 नंतर लग्न केल्यास गरोदरपणात समस्या येऊ शकतात, त्यामुळे अशा जोडप्यांनी लग्नानंतर लगेचच अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. वयाच्या 30 नंतर, महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता कमी होते. म्हणुनच अशा दाम्पत्यांना पालक होण्यापुर्वी पती-पत्नी दोघांच्याही आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. या वयात, पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे मुलामध्ये अनेक रोगांचा धोका वाढतो. या वयात तुम्ही गरोदर राहिल्यास तुमच्या मुलाला ऑटिझम सारख्या आजारांचा धोका असतो, असे अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे.

35-40 वर्षा दरम्यान लग्न झाले असेल तरः-

या वयात लग्न झाल्यावर, मूल होण्याआधी, स्त्री-पुरुषांनी त्यांची एकंदरीत तब्येत तपासली पाहिजे आणि ते निरोगी मुलाला जन्म देऊ शकतील की नाही याची खात्री करून घ्यावी. या वयात मुले झाल्यामुळे डाउन सिंड्रोम आणि ऑटिझमचा धोका अनेक पटींनी वाढतो. महिलांमध्येही गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

४०-४५ वर्षा दरम्यान लग्न झाले असेल तर-

या वयात लग्नानंतर मूल होणे खूप कठीण असते कारण आई आणि मुलाच्या समस्या अनेक पटींनी वाढतात. अभ्यास दर्शविते की या वयोगटातील 19 पैकी एक महिला मुलांमध्ये गुणसूत्र विकार आहेत. या वयात स्त्रीला नॉर्मल प्रसूती होणे खूप अवघड असते. जन्मानंतर बाळामध्ये ऑटिझमचा धोका असतो, त्याचप्रमाणे त्याचा शारीरिक आणि मानसिक विकासही व्यवस्थित होत नाही.

45 वर्षांनंतर जर तुमचे लग्न झाले असेल तर

वयाच्या 45 वर्षांनंतर जर तुमचे लग्न झाले आणि तुम्हाला मुल हवे असल्यास ते खूप कठीण होणार आहे. कारण या वयात गर्भधारणेची शक्यता फक्त एक टक्के आहे. स्त्री जरी गर्भवती झाली तरी तिला गरोदरपणात उच्च रक्तदाब, मधुमेहाचा सामना करावा लागतो. या वयात, पुरुषांचे शुक्राणू देखील खूप कमकुवत होतात, त्यामुळे मुलामध्ये मानसिक आणि शारीरिक विकार होण्याची शक्यता 13 पट वाढते. स्त्रीच्या गर्भाशयात मुलगी असल्यास तिला ऑटिझम तसेच स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.