‘मासिक पाळी’ त तुम्हाला ही होतोय का जास्त रक्तस्राव? ‘त्या’ चार दिवसातील स्वच्छेतेबाबत रहा अधिक सर्तक!
मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या टिप्स: तुम्हाला मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो का, त्यामुळे या मासिक पाळी स्वच्छता टिप्सकडे दुर्लक्ष करू नका. याबाबत तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगने गरजेचे आहे. जाणून घ्या, मासिक पाळीची स्वच्छता राखण्यासाठी सोप्या टिप्स
हुतांश महिलांना मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो. अशा परिस्थितीत मासिक पाळीच्या स्वच्छतेची (Menstrual hygiene) काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा संसर्गाचा धोका वाढतो. दर महिन्याला येणाऱ्या काळात अनेक महिलांना कंबर, पाय दुखणे, उलट्या, गॅस अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जास्त रक्तस्त्राव हा देखील या समस्यांचा एक भाग आहे. जास्त रक्तस्त्राव होण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत मेनोरेजिया (Menorrhagia) म्हणतात. कधीकधी मेनोरेजियामध्ये मासिक पाळी दरम्यान मोठ्या आकाराच्या रक्ताच्या गुठळ्या देखील येतात. अशा स्थितीत खूप तीव्र वेदना होतात, त्याचप्रमाणे इतर काम करतानाही त्रास होतो. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलांना अनेक वेळा पॅड बदलावे लागतात. अशा परिस्थितीत मासिक पाळीच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थोडासा निष्काळजीपणा संसर्गाचा धोका (Risk of infection) वाढवू शकतो.
वेळेत पॅड बदला
अनेकांचा असा समज असतो की पॅड भरले की ते बदलावे. पण ते तसे करणे योग्य नाही. तुम्ही सहसा दर 4 तासांनी पॅड बदलला पाहिजे. त्याची संख्याही गरजेनुसार वाढवता येते. अशा प्रकारे, दिवसातून किमान 4 ते 5 वेळा पॅड बदलणे आवश्यक आहे. बहुतेक मासिक पाळीतील पहिले दोन दिवस जास्त त्रासदायक असतात, याची विशेष काळजी घ्या.
अंतर्वस्त्रे देखील बदला
आवश्यक असल्यास अंतर्वस्त्रे देखील बदला, मासिक पाळीमुळे तुमचे अंडरगारमेंट्स घाण होणार नाहीत याची काळजी घ्या. जर तुमच्या आतील पोशाखात थोडासा डाग असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, लगेच बदला. अन्यथा बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.
स्वच्छतेची सर्वाधिक काळजी घ्या
मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत आंघोळ करू नये, कारण त्यामुळे पोटात सूज वाढते, असा विश्वास लहान शहरांतील अनेकांचा असतो. पण हा समज चुकीचा आहे. पहिल्या दोन दिवसांत स्वच्छतेची सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून आंघोळ करा. सूज येण्याची शंका असल्यास कोमट पाण्याने आंघोळ करावी.
उन्हाळ्याच्या दिवसात ओलावा टाळा
उन्हाळ्याच्या दिवसात आर्द्रताही वाढते. अशा स्थितीत मासिक पाळीत घाम येण्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा आणि संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही वॉशरूममध्ये जाल तेव्हा प्रायव्हेट पार्ट आणि त्याच्या आजूबाजूचा भाग पूर्णपणे स्वच्छ करा. आपण इच्छित असल्यास, आपण यासाठी कोमट पाणी वापरू शकता. याशिवाय, आजकाल योनीमार्गाची स्वच्छता राखण्यासाठी अनेक प्रकारचे क्लीनर उपलब्ध आहेत.