AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : तुम्हीही दुधासोबत हे पदार्थ खाता का ? हे दुष्परिणाम ऐकाल तर आजच सोडाल या पदार्थांचे सेवन

दूध हे आपल्या आरोग्यासाठी मिळालेले एक वरदान आहे. त्यातील अनेक पोषक घटकांमुळे आपल्या शरीराला व आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण दुधासोबत काही पदार्थांचे सेवन केल्याने नुकसानही होऊ शकतं.

Health Tips : तुम्हीही दुधासोबत हे पदार्थ खाता का ? हे दुष्परिणाम ऐकाल तर आजच सोडाल या पदार्थांचे सेवन
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 28, 2023 | 1:15 PM
Share

नवी दिल्ली – दुधात अनेक पोषक घटक असतात. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर (milk) मानले जाते, परंतु अनेकांना दूध प्यायला आवडत नाही. पण आपण अनेक प्रकारे खाद्यपदार्थांमध्ये दूध घालू शकता. शेक, स्मूदी (smoothie) आणि बर्‍याच डिशेसमध्ये ते घालून सेवन केले जाऊ शकते. किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करू शकतो. पण असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन दुधासोबत (avoid this food with milk) करू नये. ते सेवन केल्याने आरोग्याचे अपरिमित नुकसानही होऊ शकते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

1) माशांचे सेवन

दुधासोबत मासे खाऊ नयेत, याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. खरंतर दूध हे थंड प्रकृतीचे असते आणि मासे उष्ण प्रकृतीचे असतात. त्यामुळे मासे आणि दूध एकत्र सेवन केल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

2) प्रोटीन युक्त पदार्थ

असे म्हटले जाते की प्रथिने आणि दूध एकत्र घेऊ नये कारण यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो आणि वजन देखील वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, ज्यांना वृद्धापकाळात स्नायूंची ताकद वाढवायची असेल त्यांच्यासाठी प्रथिने आणि दूध आवश्यक आहेत. अन्यथा इतरांनी त्यांचे एकत्र सेवन टाळावे.

3) आंबट फळं

दुधासोबत आंबट फळांचे सेवन करू नये. दुधामध्ये लिंबाचा रस घातल्यास ते फाटते. तसेच ते आरोग्यासाठीही हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थ दुधासोबत खाऊ नये, कारण पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

4) मुळ्याचे सेवन

मुळ्याचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळे मुळा खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. त्याचा पचनशक्तीवर परिणाम होतो.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.