Buttermilk benefits: कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते त्वचेसाठीही ठरते सुपर ड्रिंक.. जाणून घ्या ‘ ताक ‘ पिण्याचे 5 फायदे

उन्हाळ्यााच्या दिवसांत अनेक व्यक्ती ताकाचे सेवन करतात, मात्र हे एक असे पेय आहे जे कोणत्याही ऋतूमध्ये पिण्यास योग्य ठरते. ताकामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि त्वचाही चमकदार होते.

Buttermilk benefits: कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते त्वचेसाठीही ठरते सुपर ड्रिंक.. जाणून घ्या ' ताक ' पिण्याचे 5 फायदे
ताक पिण्याचे फायदे
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 6:08 PM

मुंबई : बटरमिल्क म्हणजेच ताक हे उन्हाळ्यात भरपूर प्यायले जाते. मात्र ताकाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची (cholesterol) पातळी कमी होते तसेच आपली त्वचाही चमकदार (glowing skin) होते, हे तुम्हाला माहीत आहे का ? ताक पिण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. खरंतर, दुधाच्या साईचे विरजण लावून, जे दही तयार होते, ते घुसळल्यानंतर लोणी वर येते व खाली जे पाणी उरते, ते म्हणजे ताक होय. इंग्रजीत त्याला बटरमिल्क (Buttermilk) असे म्हटले जाते. बाजारात विकत मिळणारे ताक हे फर्मेंटेशनद्वारे तयार केले जाते. त्यातून चरबी म्हणजेच फॅट्स काढले जातात. पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या ताकापेक्षा विकतचे ताक जास्त चिकट असते. ताकामध्ये अनेक पोषक तत्वं असतात. फार्मसी डॉट इन च्या प्राची गर्ग यांच्या सांगण्यानुसार, 100 मिलीलिटर ताकातून केवळ 40 कॅलरी उर्जा मिळते. म्हणजेच ताकामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यातून लोणी म्हणजेच बटर काढून टाकण्यात येत असल्याने त्यामध्ये फॅट्सही (चरबी) कमी असतात. मात्र ताकामध्ये प्रोटीन्स (प्रथिने) आणि कॅल्शिअम (proteins and calcium) मुबलक प्रमाणात असते. त्याशिवाय ताकात सोडिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस आणि अन्य प्रकारची व्हिटॅमिन्स भरपूर असतात.

ताक पिण्याचे 5 फायदे –

  • – ताक हे आपल्या पचनसंस्थेसाठी वरदान असते. ताकामध्ये हेल्दी बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक ॲसिड असते, ते पचनक्रियेत मदत करतात. व त्यामुळे मेटाबॉलिज्मही (चयापचय) सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते. ताक हे इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) वर उपचार करण्यातही उपयुक्त ठरते. ताकाचे सेवन केल्याने पोटाला होणारा संसर्ग आणि पोटाचा कॅन्सर रोखण्यास देखील मदत करते.
  • – ताक हे आपली हाडं व दातांसाठी अतिशय फायदेशीर असते. 100 मिलीलिटर ताकामध्ये सुमारे 116 ग्रॅम कॅल्शिअम असते. निरोगी हाडांसाठी कॅल्शिअम आवश्यत असते. ताकामुळे आपली हाडं आणि दातही मजबूत होतात. कॅल्शिअममुळे ऑस्टिओपोरायसिस सारख्या हाडाच्या आजारांना प्रतिबंध करता येतो. रक्त गोठणे, स्नायूंचे आकुंचन आणि हृदयाचे ठोके, यासाठीही कॅल्शिअम आवश्यक असते.
  • – ताकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे रक्त पेशींमध्ये सूज येत नाही. तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.
  • – ताकामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आपल्या त्वचेसाठी चांगले असते. ताकामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि ताक हे उत्तम स्किन क्लींजर व टोनर आहे. ताकामुळे टॅनिंग, मुरुमांमुळे निर्माण होणारे डाग दूर होण्यास मदत होते. ताक आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि चमकदार बनवते, ज्यामुळे ॲंटी- एजिंग प्रभाव होतो. या सर्व फायद्यांमुळे ताक आपल्या त्वचेसाठी वरदान ठरते.
  • – ताकाचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ताकामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. मात्र त्यामध्ये कॅलरीज आणि चरबी अतिशय कमी असते. ताक प्यायल्याने आपण हायड्रेटेड आणि उत्साही राहतो. ताक प्यायल्यामुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते व भूक कमी लागते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी ताक हे एक आदर्श पेय आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.