Refreshing Water Method : भात शिजवायची सर्वात सोपी आणि आरोग्यदायी पद्धत, कमी वेळात होणार भात
भातापासून बिर्याणी, खिचडी, पुलाव असे अनेक पदार्थ बनवले जातात. या पदार्थांवर लोक आवडीने ताव मारताना दिसतात. भात शिजवण्याची एक सर्वोत्तम पद्धत असते. ही पद्धत आरोग्यदायी देखील आहे
मुंबई : भारतात भात खाण्याचं प्रमाण लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. भात हा बहुतेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. भाताशिवाय जेवण अपूर्णच असं म्हटलंही जातं. तसंच भातापासून बिर्याणी, खिचडी, पुलाव असे अनेक पदार्थ बनवले जातात. या पदार्थांवर लोक आवडीने ताव मारताना दिसतात. पण भात हा प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला पोषण देईल असं होत नाही. कारण भात शिजवण्याची देखील एक योग्य पद्धत असते. तर आता आपण भात शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत.
भात शिजवण्याची एक सर्वोत्तम पद्धत असते. ही पद्धत आरोग्यदायी देखील आहे. उकळणे आणि रिफ्रेशींग वॉटर पद्धत या भात शिजवण्याच्या दोन पद्धती आहेत. या पद्धतीनुसार तांदळात जास्त पाणी टाकून त्याला उकळी आणून द्यायची आणि नंतर जास्तीचे पाणी काढून टाकायचे. ते पाणी काढल्यानंतर पुन्हा दुसरे पाणी टाकून तांदूळ शिजवला जातो.
तर दुसर्या पद्धतीनुसार, जो भात आपण शिजवतो तो घ्यायचा आणि रात्रभर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचा. भात फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे भातामध्ये स्टार्चचे प्रमाण वाढते. या भात शिजवण्याच्या दोन्ही पद्धती सर्वोत्तम आणि आरोग्यदायी आहेत.
वरील पद्धतीनुसार भात शिजवला तर या भातातील कॅलरीजचे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांपर्यंत कमी होते. तसंच तुम्ही जर भात उकळून शिजवत असाल तर आता या दोन्ही पद्धतीनुसार बनवा. कारण तांदळात आर्सेनिक खूप लवकर जमा होऊ लागते. त्यामुळे बहुतेक लोक भात खायचं टाळतात. पण तुम्ही वरील दिलेल्या पद्धतीनुसार भात शिजवला तर आर्सेनिक हे 50 टक्के कमी होण्यास मदत होते.