पाणी कमी प्यायल्याने थंडीत मुलांना होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास, या फळांनी करा दूर पाण्याची कमतरता
थंडीच्या दिवसांत मुलं पाणी कमी पितात, त्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. जर तुमची मुलंही कमी पाणी पित असतील तर तुम्ही त्यांना काही फळं खायला देऊ शकता, ज्यामुळे पोषण तर मिळतेच पण पाण्याची कमतरताही दूर होईल.
नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत आपण आजारी (health problems in winter) पडण्याचा धोका वाढतो, त्यामुळेच आरोग्याची नीट काळजी घेणे खूप महत्वाचे असते. पण मोठ्यांपेक्षा या ऋतूत मुलांच्या तब्येतीची (small kids health) काळजी घेणे जास्त आवश्यक असते. कारण थंडीच्या दिवसांत मुलांना वारंवार सर्दी- खोकला होतो व तो बराच काळ राहतो. तसंच थंडीच्या दिवसांत असंही दिसून येतं की मुलं पाणी खूप कमी पितात, त्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा (dehydration) त्रास होऊ शकतो.
मुलांना डिहायड्रेशन होणं ही एक गंभीर व (क्वचित) जीवघेणी स्थिती होऊ शकते, त्यामुळे याबाबतीत योग्य काळजी घेणे आवश्यक ठरते. हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने मुलं आजारी पडू शकतात व गरम पाणी प्यायची त्यांना सवय नसते. त्यामुळे एकंदरच पाणी कमी प्यायलं जातं. ही परिस्थिती टाळायची असेल तर काही फळांचे सेवन करता येऊ शकते, ज्यामुळे पोषण तर मिळतेच पण पाण्याची कमतरताही दूर होऊ शकते. थंडीच्या दिवसांत मुलांना कोणती फळं देता येतील ते जाणून घेऊया.
1) संत्रं
शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी संत्र्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. जर तुमचं मूल पाणी कमी पीत असेल तर त्याला दिवसभरात एखादं संत्रं देता येऊ शकतं. हिवाळ्यात सूर्योदयानंतर लहान मुलांना संत्रं दिल्यास शरीरातील पाण्याची कमतरता कमी होण्यास मदत होते आणि सर्दी होण्याचा धोकाही कमी होतो.
2) डाळिंब
मुलांच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही त्यांना डाळिंबही देऊ शकता. जर तुमचे मूल हिवाळ्यात कमी पाणी पित असेल, तर तुम्ही त्यांना डाळिंबाचा रस प्यायला देऊ शकता. ज्यामुळे त्यांचे शरीर हायड्रेट होईल तसेच डाळिंबाचे इतर अनेक फायदेही मिळतील.
3) द्राक्षं
लहान मुलांना द्राक्षं खूप आवडतात आणि शरीरातील पाण्याची कमतरताही द्राक्षं खाल्ल्याने दूर होते. तुम्ही मुलांना द्राक्षं खायला देऊ शकता किंवा त्याच्या रसाचेही मुलं सेवन करू शकतात.
4) अननस
अननसही लहान मुलांना खूप आवडते व ते खाण्यासही चविष्ट लागते. अननसामध्ये चांगल्या प्रमाणात पाणी असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते. तुम्ही मुलांना अननसाच्या फोडी खायला देऊ शकता.
5) किवी
हिवाळ्यात मुलांसाठी किवी हे एक उत्तम फळ ठरते. किवीमध्ये अनेक जीवनसत्त्वं आणि इतर पोषक तत्वं तर असतातंच पण ते शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण करते. जर तुमच्या मुलाला दिवसभरात कमी पाणी पिण्याची सवय असेल तर त्याला किमान एक किवी खायला द्या. यामुळे इतर पोषक घटकही मिळतील.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)