Hangover Cures : तळीरामांनो, थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवेळी टुण्ण व्हाल, तर असा उतरवा हँगओव्हर

अतिप्रमाणात मद्यपान केल्याने हँगओव्हर होणं ही सामान्य गोष्ट आहे. मात्र त्यामुळे डोकेदुखी आणि उलटीचा त्रास झाला तर तो कसा दूर करावा हे समजत नाही.

Hangover Cures : तळीरामांनो, थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवेळी टुण्ण व्हाल, तर असा उतरवा हँगओव्हर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 10:35 AM

नवी दिल्ली – वीकेंडचा दिवस आणि त्यातच 31st ची पार्टी.. म्हणजे पूर्ण सेलिब्रेशनचा (celebration) माहौल.. नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकांची पार्टी ड्रिंक्सशिवाय (alcohol) अधुरी राहते. मित्रांबरोबर गप्पा मारत, मजा-मस्ती करताना अनेक लोक क्षमतेपेक्षा जास्त पीतात. मात्र त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हरच्या (hangover)स्वरुपात दिसू लागतो. अतिप्रमाणात मद्यपान केल्याने हँगओव्हर होणं ही सामान्य गोष्ट आहे. मात्र त्यामुळे डोकेदुखी आणि उलटीचा त्रास झाला तर तो कसा दूर करावा हे समजत नाही.

त्यामुळे नव्या वर्षाची पार्टी करण्याआधी हँगओव्हर कसा उतरवायचा त्याचे उपाय जाणून घेऊया.

हँगओव्हरची लक्षणे

हे सुद्धा वाचा

तीव्र डोकेदुखी, वारंवार तहान लागणे, थकवा, डोळे लाल होणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, आळस, चिंता वाटणे ही हँगओव्हरची लक्षणे असू शकतात. त्याशिवाय चक्कर येणे, चिडचिड होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

या कारणांमुळे होऊ शकतो हँगओव्हर

अती मद्यपान करणे याशिवाय मद्यपानाआधी काही न खाल्ल्यामुळेही हँगओव्हर होऊ शकतो. म्हणजेच जर तुम्ही व्यवस्थित आणि संतुलित आहार घेतला असेल, मद्यपानाआधी काही खाल्ले असेल तर तुम्हाला नंतर एवढा त्रास होणार नाही. रिकाम्या पोटी मद्यपान केल्यास तुमच्या आरोग्याचे अधिक नुकसान होऊ शकते.

हँगओव्हर उतरवण्याचे उपाय

नारळपाणी प्या

हँगओव्हर उतरवण्यासाठी नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. नारळपाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि आवश्यक त्या पोषक तत्वांचीही पूर्तता करतात.

लिंबू पाणी प्या

हँगओव्हर उतरवण्यासाठी लिंबू पाणी पिणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. लिंबू पाणी नको असेल तर तुम्ही एखादे आंबट फळही खाऊ शकता, ज्यामुळे तुमचा हँगओव्हर कमी होईल. एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण नीट ढवळून ते पाणी प्यायल्याने हँगओव्हर कमी होण्यास मदत होते.

मध

मधाचे सेवन केल्यानेही हँगओव्हर कमी होऊ शकतो. मद्यपानामुळे होणारा दुष्प्रभाव कमी करण्याचे गुणधर्म मधात असतात. तसेच मधाचे सेवन केल्याने पचनासंबंधी असलेल्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

दही

मद्यपान जास्त झाले असेल तर त्यामुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी दह्याचे सेवन करणेही फायदेशीर ठरते. मात्र साखर किंवा मीठ न घालता नुसते दही खायचे आहे, हे लक्षात ठेवावे.

केळं खावे

केळ हेही हँगओव्हर उतरवण्यासाठी प्रभावी ठरते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. मद्यपान केल्याने शरीरातील अनेक महत्वपूर्ण आणि पोषक तत्वं कमी होतात,अशा परिस्थितीत केळं खाणं फायदेशीर ठरू शकतं.

पुदीना

पुदीन्याची 3 किंवा 4 पानं गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यानेही हँगओव्हर कमी होण्यास मदत होते. तसेच याच्या सेवनाने गॅसेसचा त्रासही होत नाही.

महत्वाच्या टिप्स

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका, कारण मद्यामुळे आपले शरीर डिहायड्रेट होते. त्याशिवाय पुरेशा प्रमाणात झोप घ्या, ज्यामुळे आपले मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स राहील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.