मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. (Bharat Biotech’s Covaxin Set For Trials on Children Aged Between 2 to 18 Years)
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. (Bharat Biotech’s Covaxin Set For Trials on Children Aged Between 2 to 18 Years)
भारत बायोटेक कंपनीला 2 ते 18 वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची ट्रायल करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC)ने शिफारस केली होती. त्याला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. ही क्लिनिकल ट्रा्यल 525 मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही ट्रायल होणार आहे. कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज 3ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज 2 चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.
सध्या दोन लस वापरात
2 ते 18 वर्षांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज 2 आणि फेज 3च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी द्यायला हवी, अशी शिफारस SECने केली होती. भारतात सध्या ज्या दोन व्हॅक्सिनचा उपयोग केला जात आहे. त्या केवळ 18 वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट येणार असून या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त केली होती. तिसरी लाट आली तर लहान मुलांचं काय होणार? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होणार? या मुलांवर कशाप्रकारे उपचार होणार? आदी बाबींवर आतापासूनच विचार करण्याची गरज आहे, असं कोर्टाने केंद्राला म्हटलं होतं. तिसऱ्या लाटेचा इशारा मिळाल्यानंतर अनेक राज्यांनी लहान मुलांसाठी स्पेशल रुग्णालय आणि कोविड सेंटर्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे. (Bharat Biotech’s Covaxin Set For Trials on Children Aged Between 2 to 18 Years)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 12 May 2021 https://t.co/51w1GPu1XN #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
संबंधित बातम्या:
Thane Drive in Vaccine | ठाण्यातही ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र, कुठे सोय? नियम आणि अटी काय?
या दोन ब्लड ग्रुपच्या लोकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज
(Bharat Biotech’s Covaxin Set For Trials on Children Aged Between 2 to 18 Years)