‘या’ आसनामुळे असंतुलित हार्मोन्सची समस्या होते दूर, अन्य योगासनंही आहेत फायदेशीर

शरीरात हार्मोन्सचे संतुलन नीट नसल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. भुजंगासनासह इतर अशी अनेक योगासने आहेत, ज्यामुळे असंतुलित हार्मोन्सची समस्या दूर होते.

'या' आसनामुळे असंतुलित हार्मोन्सची समस्या होते दूर, अन्य योगासनंही आहेत फायदेशीर
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 1:23 PM

शरीरातील हार्मान्सचे (Hormonal imbalance) संतुलन बिघडले असेल तर त्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात. हार्मोन्स आपल्या शरीरासाठी (Good for health) खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही, तर त्यामुळे शरीराची वाढ होते आणि मेटाबॉलिझमही नीट राहते. जर हेच हार्मोन्स असंतुलित झाले तर शरीरात वेदना, थकवा, झोप येण्यात अडचण, त्वचेच्या समस्या, लठ्ठपणा, वजन कमी होणे, अनियमित मासिक पाळी, असे अनेक त्रास होऊ शकतात. हे असंतुलित हार्मोन्स नीट करण्यासाठी तब्येत नीट ठेवमे महत्त्व चे आहे. भुजंगासन (Bhujangasan) केल्याने तुम्हाला यामध्ये मदत मिळू शकते. हे योगासन केल्याने हार्मोन्स संतुलित राहतात. भुजंगासन कसे करतात व त्याचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊ या…

भुजंगासनाचे फायदे –

असंतुलित हार्मोन्स नीट करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर ठरते. या आसनाला कोब्रा पोझ असेही म्हणतात. मागच्या बाजूला वाकून हे आसन केले आहे. हे आसन केल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

कसे करावे भुजंगासन?

  • – जमिनीवर चटई किंवा मॅट अंथरावी आणि पोटावर झोपावे.
  • – आपल्या हाताचे तळवे खांद्याखाली ठेवावे.
  • – पाय सरळ जोडलेले असावेत.
  • – खांदे सरळ करत हातांवर भार टाकत शरीराचा वरचा भाग हातावर उचलावा.
  • – हळू-हळू शरीर खाली आणत तसेच रोखून ठेवावे.

अन्य योगासनेही ठरतात फायदेशीर –

  • – असंतुलित हार्मोन्सवर उपचार करण्यासाठी उष्ट्रासन म्हणजेच उंट पोझ, ससंगासन, रेझिस्टन्स अँड वेट्स, हाय इंटेन्सिटी इंटर्व्हल ट्रेनिंग, वॉकिंग, शलभासन इत्यादी
  • गोष्टीही फायदेशीर ठरू शकतात.
  • – Bodywise.com नुसार, सेतू बंध सर्वांगसनानेदेखील असंतुलित हार्मोन्स बरे केले जाऊ शकतात. यामुळे थायरॉइड सुधारते.
  • – बद्ध कोणासन केल्याने पीसीओडीच्या समस्येपासून आराम मिळतो.
  • – मलासन स्नायू टोनिंगसह हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.