Blood sugar level: रक्षाबंधनाला गोड खाल्ल्याने ‘शुगर लेव्हल’ वाढलीय का? अशा पदधतीने करा नियंत्रित!
रक्षाबंधनानिमित्त कुटुंबात नातेवाईकांचे येणेजाणे वाढते. त्यानिमित्त घरातील सदस्यही गोड पदार्थांवर ताव मारायला मागेपुढे पाहात नाही. अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णांची मात्र, शुगर लेव्हल वाढू शकते. राखीनिमित्त खूप गोड खाल्ल्यानंतर तुम्हाला साखरेची पातळी जास्त जाणवत असेल तर, जाणून घ्या, साखर नियंत्रणासाठी काही सोपे उपाय.
रक्षाबंधनाला कुणी मिठाई खाणार नाही, असे होऊ शकत नाही. चवीसाठी आपण मिठाई खातो, पण त्याच्या अतिसेवनाने शरीरात आरोग्याच्या अनेक समस्या (Many health problems) निर्माण होतात. राखी सारख्या प्रसंगी असे बरेच लोक आहेत जे मधुमेही असूनही मिठाई खाणे टाळत नाहीत. मधुमेहाबद्दल बोलायचे झाले तर आजकाल हा एक सामान्य आजार झाला आहे. वास्तविक, गोड पदार्थ आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी खराब (Poor insulin levels) करते आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते. आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी आणि यकृतावर त्याचा वाईट परिणाम (Bad results) अधिक होतो. राखीमध्ये खूप गोड खाल्ल्यानंतर तुम्हाला साखरेची पातळी जास्त जाणवत असेल तर, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. परंतु, काही घरगुती उपायांनीही आराम मिळू शकतो.
मेथीचे दाणे
आयुर्वेदात साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक पद्धती सांगितल्या आहेत. आयुर्वेदानुसार मेथीचे दाणे आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपाय आहेत. त्यात प्रथिने, चरबी, कर्बोदके, कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड, जीवनसत्त्वे ए, सी, के, बी, मॅंगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, जस्त आणि फायबर असतात. रात्री भिजवलेल्या मेथीचे पाणी गाळून प्या. रक्षाबंधनानंतर असे दोन ते तीन दिवस सतत करा म्हणजे तुम्हाला फरक दिसून येईल.
बीटरूट
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध, बीटरूटमध्ये भरपूर लोह असते आणि साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील सर्वोत्तम मानले जाते. खरं तर, त्यात फोलेट असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले नायट्रिक ऑक्साइड नावाचे रसायन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. त्यातील नैसर्गिक साखरेचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा रामबाण उपाय मानला जातो.
लसूण
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी हे प्रभावी मानले जाते. त्याचबरोबर लसूण हा उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित ठेवतो. लसणात असलेले एलिसिन तत्व स्वादुपिंडाला शरीरात इन्सुलिन तयार करण्यास चालना देते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. लसूण तुम्ही अनेक प्रकारे सेवन करू शकता, पण भाजलेला लसूण जास्त फायदेशीर ठरू शकतो.