वजन कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस ! ‘बीएमआय’ करावा लागेल कमी
आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी ऑनलाइन ब्रोकरेज फर्म झेरोधा चे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी एक भन्नाट योजना आखली आहे. 'जागतिक आरोग्य दिना'च्या निमित्ताने एका घोषणेमध्ये ते म्हणाले की ज्या कर्मचाऱ्यांचा BMI (बॉडी मास इंडेक्स) 25 पेक्षा कमी आहे त्यांना बोनस म्हणून 15 दिवसांचा पगार दिला जाईल.
आर्थिक सेवा पुरविणारी कंपनी झेरोधा (Zerodha) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की जर त्यांनी वजन कमी केले तर त्यांना बोनस दिला जाईल. कंपनीचे सीईओ नितीन कामथ यांनी गुरुवारी सांगितले की, एखाद्या व्यक्तीचा ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) मोजणे हा आरोग्य आणि फिटनेसचा (fitness) प्रवास सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ‘जागतिक आरोग्य दिनाला’ (World Health Day) टॅग करत, नितीन कामथ यांनी केलेल्या ट्विट मध्ये ही घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘ज्या कर्मचाऱ्यांचा बीएमआय 25 पेक्षा कमी आहे त्यांना बोनस म्हणून अर्ध्या महिन्याचा पगार मिळेल. एवढेच नाही तर जे कर्मचारी बीएमआय 24 च्या खाली आणतील, त्यांना अर्धा महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळेल.’ कामथ म्हणाले, त्यांच्या समुहातील कर्मचाऱयांचा सरासरी बीएमआय 25.3३ आहे. ते म्हणाले, झिरोधा हा विशेष कार्यक्रम फन हेल्थ प्रोग्राम चालवत आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रवृत्त करता येईल. फन हेल्थ प्रोग्रॅमनुसार झिरोधाच्या कर्मचाऱ्यांचे वजन कमी झाल्यास त्यांना बोनस मिळू शकतो.
BMI म्हणजे काय?
BMI पूर्वी Queenlet Index म्हणून ओळखले जात असे. ही एक पद्धत आहे ज्यामध्ये उंची आणि वस्तुमानाच्या आधारे प्रौढांची पोषण स्थिती निश्चित केली जाते. 18.5 ते 25 मधील बीएमआय सामान्य आहे. जर बीएमआय 25 ते 30 च्या दरम्यान असेल तर त्याचे वजन जास्त आहे आणि जर ते 30 पेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणा दर्शवते. 18.5 पेक्षा कमी BMI कमी वजन दर्शवितो. .
बीएमआयची गणना कशी करावी?
बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स मोजण्यासाठी एक साधे सूत्र आहे. हे खरे तर, ते तुमच्या शरीराचे वजन आणि उंचीचे गुणोत्तर आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे वजन 60 किलो असेल आणि तुमची उंची 5 फूट (1.52 सेमी मध्ये) असेल, तर तुमचा बीएमआय पुढीलप्रमाणे मोजा…
- उंची- 152 सेंटीमीटर = 1.52 मीटर
- उंचीचा चौरस (1.52×1.52) m2= 2.31 m2
- वजन – 60 किलो
- BMI= 60/2.31= 25.97
उच्च किंवा कमी BMI चे धोके
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर बीएमआय पातळी 30 पेक्षा जास्त असेल तर मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार, संधिवात, पक्षाघात, पित्ताचे खडे आणि अनेक प्रकारचे कर्करोग जसे की स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग किंवा किडनीचा धोका असतो. कर्करोगाला प्रोत्साहन देऊ शकते. त्याचप्रमाणे बीएमआय खूप कमी असण्याचेही तोटे आहेत. कमी बीएमआय हाडांची झीज, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या आणि लोहाची कमतरता अशक्तपणा निर्माण करू शकते. बीएमआय कमी असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. आहारतज्ञ देखील बीएमआय वाढवण्यास आवश्यक मार्गदर्शन करतात.