Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona: कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस घेतल्याने अनेक फायदे, वाचा तज्ज्ञ काय सांगतात ?

कोविडशी लढण्यासाठी हायब्रिड इम्युनिटी ही सर्वोत्तम आहे. ज्या व्यक्तींना हा आजार आधी झाला आहे आणि ज्यांनी COVID-19ची लस घेतली आहे, अशा लोकांमध्ये विषाणूंविरुद्ध हायब्रिड इम्युनिटी (प्रतिकारशक्ती) निर्माण होते.

Corona: कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस घेतल्याने अनेक फायदे, वाचा तज्ज्ञ काय सांगतात ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 10:11 AM

नवी दिल्ली – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (corona in china) धुमाकूळ सुरू झाला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग हायअलर्टवर असून भारतातही नव्या मार्गदर्शक तत्वं (new regulations) जारी करण्यात आली आहेत. कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये याकरिता मास्कचा (wear mask) वापर अनिवार्य झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, सामाजिक आंतर राखणे अशा नियमांचे पालन करण्याचा निर्णय ठिकठिकाणी होऊ लागला आहे.

एपिडेमियोलॉजिस्ट आणि आरोग्य तज्ज्ञ एरीक फिगल-डिंग यांच्या सांगण्यानुसार, निर्बंध हटवल्यापासून चीनमधील रुग्णालये ओसंडून वाहत आहेत. पुढील तीन महिन्यांत चीनमधील 60 टक्के आणि जगातील 10 टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच लाखोंच्या संख्येने मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

कोविडशी लढण्यासाठी हायब्रिड इम्युनिटी ही सर्वात मजबूत प्रतिकारशक्ती म्हणून स्वीकारली गेली आहे. ज्या व्यक्तींना हा आजार आधी झाला आहे आणि ज्यांनी COVID-19ची लस घेतली आहे, अशा लोकांमध्ये विषाणूंविरुद्ध हायब्रिड इम्युनिटी (प्रतिकारशक्ती) निर्माण होते. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे नैसर्गिक आणि लस-निर्मित प्रतिकारशक्तीपेक्षा सुमारे 25 ते 100 पट जास्त अँटी-बॉडीज तयार होतात.

हे सुद्धा वाचा

कोविडशी लढा देण्यासाठी जेव्हा भारतात लसीकरण सुरू झाले तेव्हा लाखो लोकांनी लस घेतली आणि त्या माध्यमातून हायब्रिड इम्युनिटी प्राप्त झाली . मात्र त्यापैकी काही लोकांना संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या आधीच मिळाली होती. म्हणूनच भारतातील लोकांनी नैसर्गिकरित्या आणि लस घेऊन प्रतिकारशक्ती विकसित केली. त्यामुळेच नैसर्गिकरित्या मिळालेली प्रतिकारशक्ती आणि लसीकरणाद्वारे विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीला हायब्रिड इम्युनिटी म्हणतात.

भारतात काय स्थिती आहे ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, भारतात हायब्रिड इम्युनिटी खूप जास्त आहे. मात्र, या परिस्थितीत बूस्टर डोस घेणे महत्त्वाचे ठरेल. ज्या लोकांना लस घेण्याबद्दल संभ्रम असेल किंवा संकोच वाटत असेल ते आता पुन्हा आलेल्या विषाणूच्या प्रसाराचा धोका ओळखतील आणि तिसरा डोस किंवा बूस्टर डोस घेण्यासाठी पुढे येतील. बूस्टर डोसच्या माध्यमातून या रोगाच्या गंभीर स्वरूपाविरूद्ध हर्ड इम्युनिटी निर्माण होईल आणि मोठ्या लोकसंख्येला विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती मिळेल.

हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?

हर्ड या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे कळप किंवा समूह, तर इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती. म्हणून हर्ड इम्युनिटीचा अर्थ होतो समूहाची रोगप्रतिकारकशक्ती. जेव्हा समाजातील बहुसंख्य लोकांच्या शरीरात एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा त्या रोगाचा परिणाम कमी होऊ लागतो. विशेष म्हणजे त्यासाठी समाजातील सर्व म्हणजे 100 टक्के लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची गरज पडत नाही. 70 टक्के लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार झाली तरी साथ आटोक्यात येऊ शकते.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.