AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येत नाही? मग सावध व्हा… नियमित पीरियड्स येण्यासाठी ‘हे’ करा फॉलो

महिलांना वेळेवर आणि नियमित मासिक पाळी न येणं काही आजारांचं लक्षण असू शकतं. जर तुम्हालाही वेळेवर, नियमित मासिक पाळी येत नसेल तर वेळीच सावध व्हा... लक्षात येताच डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या.

तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येत नाही? मग सावध व्हा... नियमित पीरियड्स येण्यासाठी 'हे' करा फॉलो
periods
Follow us
| Updated on: Apr 01, 2025 | 5:14 PM

बऱ्याच महिलांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वावरत असताना महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्याही वाढताना दिसून येत आहेत. काही महिलांना वेळेवर मासिक पाळी न येणं, मासिक पाळी वेळेच्या आधीच येणं, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर बऱ्याच दिवस रक्तस्त्राव सुरू रहाणं, एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येणं… अशा मासिक पाळी संबंधित अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. यामध्ये अनियमित मासिक पाळी येणं हे गंभीर आजाराचं लक्षण असण्याची शक्यता आहे. जर तुम्हालाही मासिक पाळी नियमित न येण्याची समस्या असेल तर या लक्षणाला हलक्यात घेऊ नका. यासंबंधित डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि शक्य तितक्या लवकर उपचार सुरू करा. तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

दिल्लीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सलोनी यांनी यासंदर्भात माहिती देताना असे सांगितले की, वेळेवर मासिक पाळी न येणे हे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच पीसीओएसचे एक मुख्य लक्षण असते. पीसीओएस हा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. जो आजार प्रामुख्याने महिलांमध्ये आढळतो. आज वेगवान आयुष्य जगत असलेल्या महिलांमध्ये खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी दिसून येतात. या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार महिलांमध्ये खूप सामान्य जरी वाटत असला तरी वेळीच सावध होणं तितकंच महत्त्वाचं आहे. वेळेवर मासिक पाळी न आल्याने वजन वाढणे आणि चेहरा आणि त्वचेवर पुरळ येणे या सारखे लक्षणं दिसू लागतात.

काही महिलांना थायरॉईड या आजारामुळे वेळेवर मासिक पाळी न येण्याची समस्या दिसून येते. जेव्हा महिलेमधील थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा अनियमित मासिक पाळीची समस्या जाणवते. थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नसल्याने महिलांना मासिक पाळी न येणे, वजन वाढणे आणि थकवा जाणवणं यासारखे लक्षणे दिसून येतात. थायरॉईड हा रोग अनुवांशिक कारणांमुळे होतो. तर महिलांमध्ये मानसिक ताण-तणाव हे देखील वेळेवर मासिक पाळी न येण्याचे एक मुख्य कारण असू शकते. याशिवाय, महिलांना वेळेवर पाळी न येण्याचं कारण म्हणजे गर्भाशयाशी संबंधित कोणताही आजार देखील असू शकते.

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी ‘हे’ करा फॉलो

वेळेवर मासिक पाळी येण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्हाला देखील अनियमित मासिक पाळी येत असेल आणि तुम्हाला मासिक पाळी नियमित यायला हवी असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे. रोजच्या आहारात फळे, पालेभाज्या आणि कडधान्ये समावेश करा.
  • मासे आणि अक्रोड यांसारखे ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतात.
  • नियमित व्यायामामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. दररोज योगा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मानसिक ताण-तणावाची समस्याही उद्भवू शकत नाही.
  • दरम्यान, तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळत असतील, तर नियमित तपासणी करून घ्या. यामुळे महिलासंबंधित कोणत्याही आजारावर वेळेवर उपचार करणे शक्य होऊ शकते.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च.
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल.
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.