थेट जा अन् घरी न्या; ‘या’ औषधांसाठी आता डॉक्टरांची चिट्ठी नको, आरोग्य मंत्रालयाचा आदेश
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं(Health Ministry) औषधांची अधिक मागणी आणि नागरिकांच्या सहकार्यासाठी पॅरासिटामोल व अन्य 15 औषधांचा समावेश ओटीसी यादीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थेट डॉक्टरांच्या चिट्ठीविना पॅरासिटामोल व अन्य औषधे काउंटवर थेटपणे उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली- भारतीयांमध्ये दुखणं दूर करण्यासाठी पॅरासिटामोल (Paracitamol) घेण्याकडं सर्वाधिक कल असतो. ताप आणि सर्दी तसेच शरीरातील दुखणं दूर करण्यासाठी पॅरासिटामोल औषध घेतले जाते. डॉक्टरांकडे निदानासाठी जाण्याऐवजी पॅरासिटामोल घेण्यामुळं आराम मिळतो. मात्र, पॅरासिटामोल घेण्यासाठी मेडिकल दुकानांत डॉक्टरांची चिट्ठी (Doctor Prescription) दाखविणं अनिवार्य ठरतं. डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषधे मिळत नसल्यामुळे अनेकवेळा अडचणींचा सामना करावा लागतो. माध्यमातील वृत्तांनुसार, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं(Health Ministry) औषधांची अधिक मागणी आणि नागरिकांच्या सहकार्यासाठी पॅरासिटामोल व अन्य 15 औषधांचा समावेश ओटीसी यादीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थेट डॉक्टरांच्या चिट्ठीविना पॅरासिटामोल व अन्य औषधे काउंटवर थेटपणे उपलब्ध होणार आहे.
नोटिफिकेशन जारी
माध्यमातील वृत्तानुसार, आरोग्य मंत्रालयानं औषधविषयक कायद्यांत महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय स्तरावरुन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्राच्या वतीनं करण्यात आलेल्या फेरबदलामुळे एकूण 16 औषधांचा परिशिष्ट के मध्ये समावेश करण्यात आला आहे. नव्या बदलानुसार वितरक या औषधांचे डॉक्टरांच्या चिट्ठीविना विक्री करू शकतील. केंद्र सरकारच्या नव्या पावलामुळं सर्वसामान्यांना औषधे वेळेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘या’ अटी महत्वाच्या
डॉक्टरांच्या चिट्ठी विना दिली जाणाऱ्या औषधांच्या वितरणासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये औषधांचा वापर 5 किंवा अधिक दिवसांसाठी केला जाऊ नये अशी प्राथमिक अट आहे. जर रुग्णाला पाच दिवसांत आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं ठरेलं. आरोग्य मंत्रालयानं नव्या नियमांच्या बाबतीत भागधारकांकडून एक महिन्याच्या आत सल्लावजा शिफारशी मागितल्या आहेत.
प्रीस्क्रीप्शन शिवाय ‘ही’ औषधे
माध्यमातील वृत्तानुसार पॅरासिटामोल व्यतिरिक्त डायक्लोफेनेक (diclofenac), नाक दुखीवरील औषधे (nasal decongestants), अँटी-एलर्जिक (anti-allergics) औषधे, अँटिसेफ्टिक आणि निर्जूंतवणूक घटक, (Chlorohexidine), डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड लोझेंजेस (Dextromethorphan Hydrobromide Lozenges) या औषधांचा समावेश आहे.
गोळी एक, फायदे अनेक :
पॅरासिटामोलचे फायदे एकाधिक आहेत. खालील समस्यांमध्ये उपचारासाठी पॅरासिटामोल उपयुक्त मानली जाते.
· ताप
· दुखणे
· पाठीच्या खालील भागात दुखणे
· डोके दुखणे
· दात दुखणे
· मायग्रेन
· सर्दी-खोकला
· ऑपरेशन नंतरचे दुखणे