मळमळ, मूड स्विंग आणि बरंच काही, गरोदरपणातील समस्यांवर सात घरगुती उपाय
माहिती नसेल किंवा कधी लक्षात आलं नसेल. पण गरोदरपणात महिलांच्या शरीराला विशेष वास येतो. अगदी त्यांच्या तोंडातूनही एक प्रकारचा वास येईला लागतो. शरीरात होणाऱ्या बदलामुळे हे होतं. यात चिंता करण्यासारखं काही नसतं.
गरोदरपणात (Pregnancy) महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. काही बदल हे आनंदायी असतात. ते काही तुम्हाला त्रासद्यायक असतात. गरोदरणात तुमची जीवनशैली बदलून जाते. हार्मोन्स (Hormones) बदलामुळे तुम्हाला मळमळ, मूड स्विंग, डोकेदुखी इत्यादी त्रास होतात. या समस्या सामान्य आहेत. आपण गरोदर आहोत हे समजता महिला (Women) दुप्पट काळजी घ्यायला लागते. तिचं सगळं लक्ष आपल्या गर्भातील बाळाकडे असतं. शरीरात होणाऱ्या बदलाकडे तिचं लक्ष जात नाही. तुम्हाला माहिती नसेल किंवा कधी लक्षात आलं नसेल. पण गरोदरपणात महिलांच्या शरीराला विशेष वास येतो. अगदी त्यांच्या तोंडातूनही एक प्रकारचा वास येईला लागतो. शरीरात होणाऱ्या बदलामुळे हे होतं. यात चिंता करण्यासारखं काही नसतं. पण यांचं नेमकं कारण काय, यासाठी कुठली काळजी घ्यायला पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
• असं तुम्हाला पण होतंय का? – तुमच्या शरीरातूनही वास येतोय. तर गरोदरपणात तुमची वास घेण्याची क्षमता वाढते. तुमच्या गर्भातील बाळाच्या विकासासाठीही शरीरात काही बदल होत असतात. बाळाला ऑक्सिजन मिळावं म्हणून शरीरातील रक्तपुरवठा 50 टक्के वाढतो. या स्थितीत महिलांच्या शरीराचे तापमान वाढतं. शरीराचे तापमान थंड राहावे म्हणून रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात घाम येतो. आणि शरीरातून एक प्रकारे दुर्गंधी यायला लागते. रात्रीच्या वेळी घाम येणं ही या काळातील कॉमन समस्या आहे.
• हार्मोन्स बदलामुळे अनेक बदल – गरोदरपणात आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलाच्या आपल्या शरीरावर आणि स्वभावावर बदल होतो. याच हार्मोन्स बदलामुळे आपल्या शरीरातून वास येतो.
• सकस आहार – गरोदरपणात आपल्या आहार बदलेला असतो. गर्भातील बाळाच्या पोषणासाठी आपण आपल्या आहारात बदल करतो. काही पौष्टिक पदार्थांमुळे आपला शरीराला वास यायला लागतो. ब्रोकली, फुलगोबी आणि पत्तागोबी या भाज्यापासूनही तोंडातून आणि शरीरातून वास येतो. मटन खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता वाढते. आणि आपल्याला घाम येतो.
आता जाणून घेऊयाता कधी होतो हा त्रास – तर साधारण गरोदरपणाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात हा त्रास होतो. नंतरच्या 6 महिन्यात शरीरातील रक्तपुरवठा वाढतो. त्या दिवसांमध्ये शरीरातून दुर्गंधी वाढते.
काय काळजी घ्यावी 1. सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे. हवा खेळती राहिल असं कपडे या दिवसात घाला. 2. शरीर स्वच्छ ठेवा. रात्री झोपतानाही आंघोळ करा. 3. मसालेदार खाणे टाळा. 4. कांदा, लसून आणि मटण टाळा. 5. फळं आणि हिरवाभाजीपाला खा. 6. कपडे कायम धुतलेले घाला. 7. जास्त उन्हात फिरू नका. शरीर थंड राहिल याची काळजी घ्या.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
संबंधित बातम्या :
वारंवार पेनकिलर घेताय? वेळीच सावध व्हा… शरीरावर होतात गंभीर परिणाम
मुलाच्या वजन-उंचीमुळे तुम्ही त्रासले आहात? 6 पदार्थ तुमची चिंता करतील दूर