शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने शरीरात घडतील चांगले बदल, अनेक समस्यांपासून होईल सुटका

दररोज सकाळी शेवग्याची पाने चघळल्याने तुम्हाला शरीरातील अनेक आजारांपासून सुटका होते. शेवग्याच्या पानांच्या भाजीचे देखील फायदे आहेत. परंतू शेवग्याची पाने कच्ची चावून खाल्ल्याने माणसाच्या शरीरात चांगले बदल होतात.

शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने शरीरात घडतील चांगले बदल, अनेक समस्यांपासून होईल सुटका
moringa - shevga sahjan leaves
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 7:40 PM

शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने शरीराला चांगला फायदा होतो. काही जण शेवग्याच्या शेवग्यांच्या शेंगा खातात परंतू शेवग्याच्या पानांची देखील चांगली भाजी होते. शेवग्यांच्या या पानांमुळे शरीराला चांगला फायदा होतो. शेवग्यांची पाने नियमित खाल्ल्याने तुम्हाला निरोगी आणि उत्साही जीवन जगायला मदत होते. चला तर पाहूयात शेवग्यांच्या पानामुळे शरीराला नेमके काय-काय फायदे होतात…

1 – शेवग्यांच्या पानात विटामिन्स ए,सी,ई, आणि बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. नियमित सेवनाने आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात आणि आरोग्य चांगले रहाते.

2 – शेवग्याच्या पानात एंटी ऑक्सीडेंट तत्वांचा खजाना आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच शरीर आजारांचा योग्य प्रकारे सामना करू शकते.

3 – शेवग्याची पाने सकाळी उपाशी पोटी चावून खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण राहाण्यास मदत मिळते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास सहायक ठरते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

4 – शेवग्याच्या पानात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनयंत्रणा देखील चांगली रहाते. यामुळे बद्धकोष्ठता देखील दूर रहाते, अन्य पचनासंदर्भातील आजारही दूर होतात.

5 – या पानात विटामिन्स ए आणि ईचे प्रमाण जादा असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले होते. त्वचेला सुरुकत्या होण्याचे प्रमाण देखील कमी होते.

6 – शेवग्याच्या पाने मेटाबॉलिझ्म वाढविण्यास मदत करतात,ज्यामुळे वजन नियंत्रणात राहाते. याच्या सेवनामुळे भूक कमी होते. आणि शरीरातील ऊर्जा वाढते.

7 – शेवग्यांच्या पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहाते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना ही पाने चघळल्याने फायदा होतो.

8 – मानसिक आरोग्यासाठी देखील ही पाने चांगली असतात. यातील तत्वे तणाव आणि चिंता दूर करतात.

9 – यातील एंटीऑक्सीडेंट घटकांमुळे शरीरातील फ्रि रेडीकल्सशी लढण्यास मदत करते. हे शरीराला डिटॉक्सिफाय करते. अनेक रोगांचा बचाव करते.

( ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. योग्य सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या )

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.