AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Child Care | नवजात बाळाचा संसर्गापासून कसा कराल बचाव? जाणून घ्या खास टिप्स…

नवजात मुलामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा नसते, जी थोडीफार असते तीसुद्धा त्याला आईद्वारे प्राप्त होते. साधारणपणे रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास 9 महिने लागतात.

Child Care | नवजात बाळाचा संसर्गापासून कसा कराल बचाव? जाणून घ्या खास टिप्स...
नवजात बाळाची काळजी
| Updated on: Feb 18, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई : नवजात मुलामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा नसते, जी थोडीफार असते तीसुद्धा त्याला आईद्वारे प्राप्त होते. साधारणपणे रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास 9 महिने लागतात. म्हणूनच, बाळास रोगाशी लढण्याची फार कमी क्षमता आहे आणि कधी कधी दुर्लक्षामुळे ते संसर्गाला बळी पडतात (Child care tips for new born baby).

नवजात बाळास त्वचा, कान, नाक, डोळे आणि तोंडात कोठेही संक्रमण होऊ शकते. अस्वच्छ हातांनी बाळाला स्पर्श करणे, अस्वच्छ कपडे, तेल किंवा पावडर वापरणे यामुळे देखील त्यांच्यामध्ये संसर्ग होऊ शकतो. या प्रकरणात, त्यांच्या आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

‘ही’ लक्षणे ओळखा!

सहसा, संसर्ग झाल्यास, मूल सुस्त होते आणि थोडे आजारी दिसू लागते. बर्‍याच वेळा पोटदुखीमुळे पोट फुगते, रडणे, उलट्या होणे आणि अतिसार देखील या देखील समस्या असू शकतात. याशिवाय श्वासाची गतीही वेगळी असू शकते. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास, विलंब न करता तज्ज्ञांचे दाखवले पाहिजे, जेणेकरून या समस्या गंभीर स्वरुपाची होणार नाही.

बचावासाठी ‘हे’ उपाय करा

– बाळाला खायला घालण्यापूर्वी, कपडे बदलण्यापूर्वी किंवा मांडीवर ठेवण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवा. हात धुताना, नखे पूर्णपणे स्वच्छ करा.

– दागिन्यांमध्येही जंतूंचा धोका आहे, म्हणून हात धुताना धातूच्या बांगड्या, अंगठ्या वगैरे काढून ठेवल्या पाहिजेत. शक्य असल्यास, मूल लहान समजूतदार होईपर्यंत धातूच्या वस्तू घालणे टाळा (Child care tips for new born baby).

– आपण आपल्या कपड्यांची आणि शरीराची स्वच्छता काळजी घ्यावी, जेणेकरुन संक्रमण आपल्यापर्यंत पोहोचू नये. बर्‍याच वेळा आईला त्रास होत असला तरीही ते संक्रमण बाळामध्ये दिसून येते. आपल्या स्वतःच्या स्वच्छतेमुळे, नवजात मुलास देखील संरक्षण मिळेल.

– शिंका येणे स्वाभाविक आहे. परंतु, अशावेळी नेहमी एका कापडाने नाक आणि तोंड झाकून घ्यावे. नेहमी हँड सॅनिटायझर किंवा अँटीसेप्टिक वाईप जवळ ठेवाव्यात. जेणेकरून आपण हात धुण्यास असमर्थ असल्यास, स्वच्छतेसाठी त्या उपयोगी येतील.

– जर एखादी जखम झाली असेल, तर ती जखम वेळोवेळी स्वच्छ करा. त्यावर स्वच्छ पट्टी बांधा. मुलांना खुल्या जखमांपासून संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.

– जिथे मूल रांगते, किंवा फिरते तिथल्या जागेच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. प्रत्येक बाळास जन्मापासूनच लसीकरण दिले पाहिजे.

(Child care tips for new born baby)

हेही वाचा :

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.