चीनचा पुन्हा एकदा रेकॉर्ड, अवघ्या 5 दिवसात 1500 खोल्यांचं रुग्णालय बांधून पूर्ण
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर चीनने युद्धपातळीवर प्रयत्न केले आणि अवघ्या 5 दिवसांमध्ये 1500 खोल्यांचं रुग्णालयं उभं केलं.
बीजिंग : वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन चीनने पुन्हा एकदा रुग्णालय निर्मितीत रेकॉर्ड केलंय. चीनची राजधानी बीजिंग शहराच्या दक्षिण भागात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर चीनने युद्धपातळीवर प्रयत्न केले आणि अवघ्या 5 दिवसांमध्ये 1500 खोल्यांचं रुग्णालयं उभं केलं. कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णांवर उपचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तातडीने रुग्णालयाची गरज असल्याचं लक्षात आल्याने चीनने हा प्रकल्प हाती घेतला. हे रुग्णालय हेबेई प्रांतातील नांगोंग भागात उभारण्यात आलंय (China builds hospital in very short time as corona cases increased).
मागील महिन्यात नांगोंग आणि हुबेई या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ झाली होती. त्यामुळेच हा संसर्ग उर्वरित चीनच्या भागांमध्ये पसरु नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करुन संसर्ग थांबवण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. चीनने याआधी देखील अशाप्रकारे कमी वेळेत रुग्णालय उभं करण्याचा रेकॉर्ड केलाय. त्यावेळी याच वेगवान कामातून चीनने वुहानमधील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवलं होतं.
हेबेईमध्ये नवे 90 कोरोना रुग्णांनी चीनची धाकधूक वाढली
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने चीनमध्ये कोरोना विषाणूच्या 130 रुग्णांची नोंद झाल्याचं सांगितलंय. नांगोंग आणि शिजियाझुआंगमध्ये तर 645 कोरोना रुग्णांवर इलाज करण्यात आलाय. 2019 या वर्षात चीनमधील वुहानमध्ये सुरुवात झालेल्या कोरोनाने चीनमध्ये चांगलेच पाय पसरले होते. त्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करुन चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. मात्र, पुन्हा डिसेंबर 2020 नंतर चीनच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळू लागले.
कोरोनाचा नवा स्ट्रेनचा संसर्ग होण्याचाही चीनला धोका आहे. आधीच्या कोरोनापेक्षा नव्या कोरोनाचा प्रकार जास्त वेगाने पसरत असल्याची माहिती चीन सरकारने दिलीय. त्याचा संसर्ग वाढल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होणार आहे. म्हणूनच चीनने पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढल्याने नियंत्रणाचे प्रयत्न सुरु केले.
हेही वाचा :
चीनची लस फेल ठरल्यानंतर ब्राझीलची मदतीसाठी भारताकडे धाव; लशीच्या कुप्या घेण्यासाठी विमानच पाठवलं
Donald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय?
China | चीनने पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं, WHO ची टीम तातडीने वुहानला जाणार
China builds hospital in very short time as corona cases increased