नारळपाणी पिऊन वजन कमी करता येतं का ? जाणून घ्या वेट लॉससाठी हे पिण्याचा योग्य मार्ग
Coconut Water For Weight Loss : शहाळं किंवा नारळाच्या पाण्यात फायबर आढळते, जे वजन कमी करण्यास मदत करते.
नवी दिल्ली : नारळाच्या पाण्यातील (coconut water) पोषक तत्वांचा (nutrition) विचार करता याला उन्हाळी हंगामासाठी एक अद्भुत पेय म्हटले जाते. त्यात भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, जे उन्हाळ्यात शरीराला आतून हायड्रेट (hydrated) ठेवण्यास मदत करतात. नारळाच्या पाण्यात नैसर्गिक एन्झाइम्स आणि पोटॅशिअम आढळते. नारळाचे पाणी जेवढे आरोग्यासाठी चांगले मानले जाते तेवढेच हे पेय चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे.
त्यातील कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात व्यायाम केल्यानंतर काही लोक नारळाचे पाणी पितात. ज्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते (Health Benefits of Coconut Water) आणि चरबीलादेखील बाय-बाय म्हणता येऊ शकते. नारळाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते, पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, की ते पिण्याची योग्य पद्धत कोणती? त्याबद्दल जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी – Coconut Water For Weight Loss
आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ” नारळाच्या पाण्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी नारळाचे पाणी खूप चांगले मानले जाते कारण त्यात कॅलरी कमी असते. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरी असलेले अन्न खात नाही. इतकेच नाही तर नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म वाढण्यासही मदत होते.” आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म रेट जितका जास्त असतो, तेवढ्या वेगाने फॅट जलद बर्न करण्यास मदत होते. त्यामुळे वजनही कमी होते.
फायबरचा उत्तम सोर्स आहे नारळाचे पाणी
आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, नारळाच्या पाण्यात फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. एका ग्लास नारळाच्या पाण्यात सुमारे 3 ते 4 ग्रॅम फायबर आढळते. फायबर योग्य पचन आणि वजन कमी करण्यास मदत करते. इतकेच नाही तर ज्या लोकांना उन्हाळ्यात पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि उलटी होणे यांसारख्या समस्या सतावतात, त्यांनी नारळ पाण्याचे आवर्जून सेवन करावे.
वजन कमी करण्यासाठी कधी प्यावे नारळपाणी ?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नारळपाणी प्यायल्याने वजन कमी होते, पण ते पिण्याची योग्य पद्धतही जाणून घेतली पाहिजे. उन्हाळ्यात दिवसातून 2 ते 3 वेळा नारळाचे पाणी पिणे शक्य असले तरी वजन कमी करणाऱ्यांनी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. रिकाम्या पोटी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो आणि जलद वजन कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय संध्याकाळचे पेय म्हणून नारळाच्या पाण्याचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. मात्र ज्या लोकांना सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या असतील त्यांनी संध्याकाळच्या वेळेस नारळपाण्याचे सेवन करू नये, असा सल्लाही आहारतज्ज्ञ देतात.