AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes diet plan | आहारात करा ‘ या ‘ पदार्थांचा समावेश, ब्लड शुगर नेहमी राहील नियंत्रणात !

Diabetes diet plan | भारतात 20 ते 70 वयोगटातील सुमारे 8.7 टक्के प्रौढ व्यक्तींना मधुमेहाचा त्रास होतो. मधुमेहामुळे हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि मज्जातंतूंचे नुकसान होते. त्यामुळे रुग्णाने आपली जीवनशैली आणि आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Diabetes diet plan | आहारात करा ' या ' पदार्थांचा समावेश, ब्लड शुगर नेहमी राहील नियंत्रणात !
मधुमेह येईल नियंत्रणातImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 15, 2022 | 12:55 PM
Share

Diabetes diet plan | मधुमेह (Diabetes)नियंत्रणात ठेवायचा आहे? तर अगदी काही सोप्या साध्या बदलाने रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar level) नियंत्रणात ठेवात येते. व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास ब्लच शुगर नियंत्रणात राहते.

जीवनशैलीचा परिणाम

मधुमेह अथवा डायबिटीस ही विविध वयोगटातील लोकांमध्ये एक मोठी समस्या बनत चालली आहे. हा जीवनशैलीशी (Lifestyle disease) निगडीत आजार आहे, जो निष्काळजीपणामुळे वाढू शकतो. मधुमेह हा एक दीर्घ आणि मेटाबॉलिक (चयापचयाचा) आजार आहे. झपाट्याने होणारे शहरीकरण, ढिसाळ राहणीमान, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, धूम्रपान, मद्यपान यामुळे मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत आहे.

सर्व वयोगटातील लोकांना हा आजार

रक्तातील ग्लुकोजची (साखरेची) पातळी वाढते. ज्यामुळे हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि मज्जातंतू वर परिणाम होऊन ते खराब होतात. भारतात 20 ते 70 वयोगटातील सुमारे 8.7 टक्के प्रौढ व्यक्तींना मधुमेहाचा त्रास होतो.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट डॉ. विक्रांत गोसावी यांनी मधुमेहाशी संबंधित मुख्य धोके सांगितले आहेत, ज्यामध्ये लठ्ठपणाचाही समावेश आहे. ज्यामुळे मधुमेहाचा धोका दुप्पट वाढतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या जीवनशैलीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे,असे डॉक्टरांनी नमूद केले.

या पदार्थांचा आहारात करा समावेश

मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे. भूक लागल्यावर फळं खाणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच जेवतानाही थोडी-फार फळं खाणं चांगलं असतं. फळं आणि भाज्यांद्वारे शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळते, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

मांस टाळा

लाल मांस थोड्या प्रमाणात जरी सेवन केले तरी मधुमेहाचा धोका वाढू शकतो. दररोज 50 ग्रॅम मांस किंवा माशांचे सेवन केले तरी मधुमेह होण्याचा धोका 11 टक्के वाढतो.

प्रक्रिया केलेले पदार्थ नको

ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांनी ब्रेड, तळलेले पदार्थ आणि हाय-सोडिअम मांस, हॉट-डॉग तसेच प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे. मैदा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय नुकसानकारक असतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी, भूक लागल्यावर लो-कार्ब भाज्या आणि शेंगदाणे खाल्ले पाहिजेत.

गोड पदार्थ खाणे टाळावे

मधुमेहात कोणते गोड पदार्थ खावेत ? जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्यांच्यासाठी कमी कार्ब्स असलेले व साखररहित गोड पदार्थ शोधणे, कठीण होते. मधुमेहींसाठी पोषण देणारी मिठाई शोधणे, अत्यंत कठीण आहे.

डार्क चॉकलेट

मात्र मधुमेही व्यक्ती डार्क चॉकलेट खाऊ शकतात कारण त्यात मिल्क चॉकलेटपेक्षा साखर, कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज कमी असतात. 1 औंस (28 ग्रॅम) डार्क चॉकलेटमध्ये केवळ13 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी केळ्याचे आइस्क्रीम हा देखील एक चांगला आणि निरोगी पर्याय आहे.

वेळेवर जेवण करा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जेवणाची वेळ खूप महत्वाची ठरते, कारण आपण काय आणि कधी खातो, यावर शरीरात साखरेचे शोषण अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज एकाच वेळी समान प्रमाणात अन्न (विशेषत: कार्बोहायड्रेट) खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.

जेवणाचे नियोजन करावे

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रात्री हलका आहार घ्यावा. रात्री उशिरा अतिरिक्त कॅलरी खाल्ल्याने वजन वाढतं. जर एखाद्या व्यक्तीने कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतला तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.