किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु, 10 ते 12 वयोगटातील मुलांना का लस नाही? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं संपूर्ण देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालं आहे. देशात सुरुवातीच्या 6 दिवसात 1.5 कोटी पेक्षा अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे.

किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु, 10 ते 12 वयोगटातील मुलांना का लस नाही? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Corona Vaccination
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 11:52 AM

मुंबई: केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं संपूर्ण देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालं आहे. देशभरात सुरुवातीच्या 6 दिवसात 1.5 कोटी पेक्षा अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासंदर्भात अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.

नेमक्या कोणत्या वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु?

केंद्र सरकारनं 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु केलं आहे. ज्यांचे वय 17 वर्ष पूर्ण झालंय पण 18 संपलेलं नाही त्यांना देखील लस मिळणार आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 20017 मध्ये जन्म झालेल्या मुलांना देखील लस मिळणार आहे.

10 ते 12 वयोगटातील मुलांना लस कधी मिळणार?

भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापराला 12 वयोगटापासून परवागनी दिली होती. मात्र, केंद्रानं 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला. किशोरवयीनं मुलांवर लसीचा होणारा परिणाम पाहिला जाईल. त्याचा अभ्यास केला जाईल. याशिवाय वैज्ञानिक नियमानुसार 15 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शरीरात थायमस ग्लँड असतात. त्यांची रोग प्रतिकार शक् चांगली असते त्यामुळं लहान मुलांना संसर्ग झाल्यास त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. 10 ते 12 वयगोटातील मुलांच्या लसीकरणाबद्दल आगामी काळात निर्णय़ होऊ शकतो.

किशोरवयीन मुलांना लस कशी मिळणार?

किशोरवयीनं मुलांना लस घ्यायची असल्यास त्यांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. कोविन पोर्टलवर नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर गेल्यास त्यांना तिथंही लस मिळते. किशोरवयीन मुलांकडे आधारकार्ड आणि आयकार्ड सोबत ठेवणं आवश्यक आहे.

मुलांना दिली जात असलेल्या लसीची किंमत काय?

किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुर करण्यात आलं आहे. कोवॅक्सिन लस मुलांना देण्यात येत आहे. सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस मोफत आहे. तर, खासगी रुग्णालयात 1410 रुपये एका डोससाठी द्यावे लागतील.

लसीकरण केंद्रावर मुलांच्या लसीकरणारासाठी वेगळी व्यवस्था?

केंद्र सरकारनं राज्य सरकारांना मुलांच्या लसीकरणारासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत वेगळी व्यवस्था होत नाही तोपर्यंत मुलांसाठी वेगळी रांग असेल, असं सांगण्यात आलं आहे. लसीकरणासाठी वेग वेगळे कर्मचारी नेमावेत, असंही सांगण्यात आलं आहे.

लसीकरण केंद्रावर गेल्यास धोका वाढेल का?

सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या परिस्थितीत लसीकरण केंद्रावर गेल्यास आणि तिथं गर्दी असल्यास धोका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी नोंदणी करुन लसीकरण केंद्रावर जावं.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्रास झाल्यास काय?

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर पहिल्या दोन दिवसांमध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. काही वेळा ताप देखील येऊ शकतो. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानं पालकांनी मुलांना क्रोसिन, डोला किंवा पॅरासिटॉमॉल गोळी द्यावी. तीन दिवसांपेक्षा ताप जास्त असल्यास डॉक्टरांकडे जाऊन औषधं घ्यावी.

इतर बातम्या:

Mumbai-Thane Election| शिवसेनेत परिवर्तनाचे वारे; अर्ध्या नगरसेवकांच्या उमेदवारीचा पत्ता कट होणार?

‘खेळ कोणीही सुरु करुद्या, संपवण्याचं काम माझं’, टीम इंडियातील भूमिकेबाबत वेंकटेश अय्यरचं वक्त्तव्य

Corona Vaccination started for 15 to 18 year old students know some questions answer here

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.