…तर कोरोना अवघ्या पाच मिनिटात होतो निष्क्रिय? जाणून घ्या काय सांगते संशोधन
कोरोना या जागतिक महामारीबाबत आपण सगळेच परिचित आहात. अनेक देशात कोरोनाच्या लाटा अद्याप सुरुच आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून कोरोना विषाणूबाबत रोज नवनवीन संशोधन समोर येत आहे. नुकतेच कोरोना विषाणूच्या निष्क्रियतेबाबत ‘गार्डियन’कडून एक वृत्त देण्यात आले आहे.
नवी दिल्ली: ‘गार्डियन’ने नुकतेच केलेल्या एका संशोधनानुसार, कोरोना (corona)बाधित रुग्णाच्या श्वासावाटे बाहेर पडलेला कोरोना विषाणू हवेत गेल्यानंतर पाच मिनीटात निष्क्रिय होउ शकतो. हा विषाणू हवेत राहिल्यानंतर वीस मिनीटात त्याचा 90 टक़्के प्रभाव कमी होत असल्याचा अभ्यास समोर आला आहे. त्यामुळे कोरोना काळात मास्क व शारीरिक अंतर (physical distancing) का गरजेचे आहे, याचे महत्व अधिकच अधोरेखित करण्यात आले ओहे. दरम्यान, ब्रिस्ट विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे संचालक व या अभ्यासाचे प्रमुख असलेल्या प्रा. जोनाथन रीड यांच्या मते, केवळ मोकळ्या ठिकानांच्या तुलनेत एख्याद्या बंदिस्त ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची सर्वाधिक क्षमता आहे. बंदिस्त ठिकाणी कोरोना विषाणू वेगाने पसरु शकतो. त्याच वेळी जर एखादे मोकळे ठिकाण असल्यास कोरोना विषाणू आपल्यापर्यंत येइपर्यंत तो कदाचित निष्क्रियदेखील होउ शकतो. दरम्यान, ब्रिस्टल विद्यापीठातील संशोधकांनी एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामुळे त्यांना कितीही लहान, विषाणूयुक्त कण तयार करता येतात. पाच सेकंद ते 20 मिनिटांदरम्यान दोन इलेक्ट्रिक रिंग्समध्ये विषाणूयुक्त कण हळूवारपणे बाहेर काढता येते, त्यांच्या सभोवतालची आर्द्रता आणि अतिनील प्रकाशाची तीव्रता याचा त्या कणांवर काय परिणाम होतो, याचाही त्यात अभ्यास करणे शक्य होत आहे. विषाणूचे कण फुफ्फुसातील वातावरणाच्या तुलनेने ओलसर असतात. कार्बन डायऑक्साइडयुक्त (Carbon dioxide)वातावरणामुन ते बाहेर पडल्यावर जलद गतीने आपली आद्रता गमावून कोरडे होत असल्याचे अहवाल सांगतो. झी न्यूजनं यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पाच सेकंदात गमावली संसर्गक्षमता
गार्डियनच्या या अहवालात कोरोनाच्या वेगाने प्रसाराच्या गुणधर्माप्रमाणेच त्याच्या सक्रियता व निष्क्रियतेबाबतही अभ्यास करण्यात आला आहे. कुठल्या वातावरणात कोरोना विषाणू किती वेळ सक्रिय राहू शकतो, याचा अभ्यास करताना एक महत्वाची बाब समोर आली आहे. आद्र वातावरणाच्या तुलनेत कोरड्या हवेत कोरोना विषाणू केवळ पाच सेकंदात त्याची निम्मी संसर्गक्षमता गमावल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. त्यानंतरही वेळेनुसार त्याची सक्रियता हळूहळू कमी होत असते.
तापमानाचा विषाणूवर कुठलाही प्रभाव नाही
गार्डियनने आद्रतायुक्त व कोरड्या अशा दोन्ही वातावरणात विषाणूवर कुठला प्रभाव होतोय काय? याबात संशोधन केले आहे. परंतु अशा कुठल्याही वातावरणाचा विषाणूवर परिणाम होत नसल्याचे त्यांच्या संशोधनातून समोर आले आहे. विषाणूच्या संसर्गामध्ये घट ही हळूहळू होत असून 52 टक़्के कण हे पहिल्या पाच मिनिटांनंतर संक्रामक राहतात. तर 20 मिनिटांनंतर ते साधारणत: 10 टक़्क्यांपर्यंत घसरल्याचे अहवालात नमूद आहे. एक उदाहरण देताना प्रा. रीड यांनी सांगितले, की आपण आपल्या एखाद्या मित्राला भेटण्यासाठी एखाद्या ठिकाणी गेले तर कदाचित तो आपल्याला कोरोना संक्रमित करु शकतो किंवा आपण त्याला. अशा वेळी शारीरिक अंतर पाळणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी मास्कचा वापर करणे कधीही योग्य ठरु शकते.
मास्क व शारीरिक अंतराचे महत्व
तापमानाचा कोरोना विषाणूवर काहीही परिणाम होत नसला तरी वेळेनुसार त्याची सक्रियता आपोआप कमी होत जात असते. त्यामुळे त्याच्यापासून बचावासाठी मास्क व शारीरिक अंतराचे पालन करणे किती महत्वाचे आहे हे या अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे. मोकळ्या ठिकाणांच्या तुलनेत बंदिस्त ठिकाणी शारीरिक अंतराचा नियम पाळला जावू शकत नाही त्यावेळी मास्कचा वापर हा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अधिक लाभदायक ठरु शकतो. वेळेनुसार विषाणूची संसर्गक्षमता ही अधिक निष्क्रिय होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून या आधीही झाला आहे. परंतु या ताज्या अहवालातून विषाणूच्या संसर्गक्षमतेचा कालावधी हा कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
इतर बातम्या:
लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय, मग लस घ्यावी का? लसीचा एक डोस घेतल्यावर काय होतं?
Covid virus starts losing ability to infect within 5 minutes in air