Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

कोरोनाच्या काळात बहुतेक लोक घरी बसून सर्व कामे घरूनच करत होते. यामुळे बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या प्रचंड वाढली आहे.

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!
वजन मोजताय?
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 11:48 AM

मुंबई : कोरोनाच्या काळात बहुतेक लोक घरी बसून सर्व कामे घरूनच करत होते. यामुळे बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या प्रचंड वाढली आहे. तथापि, हा रोग अनुवांशिक देखील आहे, जो एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीशी जोडला जातो. परंतु मुख्यतः ही समस्या आपल्या चुकीच्या खाण्यामुळे उद्भवत आहे. खराब जीवनशैली आणि अयोग्य खाण्या-पिण्यामुळे आपले वजन अवाजवी वाढते (Daily weight measurement is not good for health).

वजन वाढल्यानंतर, लोक ते कमी करण्याचा विचार करत असतात आणि त्यासाठी नवनवीन मार्गांचा अवलंब करतात. बरेच लोक बाजारात उपलब्ध असणारी अनेक प्रकारची औषधे आणून खातात, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यताही वाढते. तथापि, ही औषधे खाऊनही बर्‍याच लोकांचे वजन कमी होत नाही.

कॅलरी बर्न करणे महत्त्वाचे!

तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी कॅलरीची संख्या नियमित तपासणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः जितक्या कॅलरी आपण सेवन करतो, तितक्याच कॅलरी बर्न देखील केल्या पाहिजेत. यासाठी दररोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.

असे बरेच लोक आहेत, जे वजन कमी करण्यासाठी दररोज त्यांचे वजन मोजतात. मात्र, वजन कमी करण्यात हे आपल्याला विशेष मदत करत नाही, त्याऐवजी आपण अधिकाधिक मानसिक तणावात जातात. यासाठी आपल्याला आठवड्यातून किती वेळा आपले वजन मोजावे, हे माहित असणे आवश्यक आहे (Daily weight measurement is not good for health).

चला तर, जाणून घेऊया ‘या’ खास नियमांबद्दल :

वजन कमी करण्यासाठी, स्वतःहून वजन मोजणे अधिक चांगले आहे. परंतु आठवड्यातून किती वेळा आपण आपले वजन मोजावे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. असे काही लोक आहेत, जे दररोज स्वतःचे वजन मोजतात. त्याच वेळी, काही लोक असे आहेत जे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा त्यांचे वजन मोजतात. आपल्याला देखील वेगाने वजन कमी करायचे असेल आणि यासाठी आपण दररोज आपले वजन मोजत असाल, तर लवकरच त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

तज्ज्ञांच्या मते, दररोज वजन मोजणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. दररोज आहार आणि व्यायामाच्या फरकांमुळे वजनात चढ-उतार होत असतात. त्याच वेळी, अत्यधिक विचार करण्यामुळे आणि अन्न खाण्याच्या अनियमिततेमुळे वजन मापनात असमतोल दिसून येतो. हे टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा वजन मोजणे योग्य आहे. डॉक्टर देखील आठवड्यातून एकदाच वजन मोजण्याचा सल्ला देतात. याचबरोबर, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, आपला आहार आणि व्यायाम देखील बदलणे अतिशय महत्वाचे आहे.

(Daily weight measurement is not good for health)

हेही वाचा :

Migraine | मायग्रेनमुळेही होऊ शकते मान दुखीची समस्या, ‘या’ लक्षणांना करू नका नजर अंदाज!

Nilgiri Oil | नीलगिरीच्या तेलाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या कशा प्रकारे वापर कराल…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.