Digene Gel Alert : डायजीन जेल वापरत असाल तर सावध, DGCA ने काय म्हटलं पाहा
ॲसिडीटीवरील उपचारासाठी प्रसिद्ध असलेले डायजीन जेल संदर्भात रुग्णांच्या तक्रारी आल्यानंतर औषध नियामक संस्थेने कंपनीला नोटीस जारी करीत हे औषध वापरु नये असा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : जर आपल्याला पित्त झाले असेल किंवा जळजळत असेल तर ॲसिडीटीचे प्रसिध्द डायजीन जेल आपण घेत असाल तर सावधान राहा. या डायजीन जेल संबंधीत महत्वाची बातमी आली आहे. ती वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडीया ( DCGI ) ने रुग्णांना आणि हेल्थकेअर क्षेत्रातील जज्ज्ञांना सल्ला दिला आहे की डायजीन जेलचा वापर करणे बंद करा. नेमके काय झाले की डायजीन जेलचा वापर करु नये असा सल्ला या नियामक संस्थेने पाहा..
डीसीजीआयने गोवा फॅसिलिटीमध्ये तयार केलेल्या प्रसिद्ध सिरप डायजीन जेल संबंधी एक अलर्ट जारी केला आहे. या डायजीन जेलचा वापर हेल्थकेअर प्रोफेशनल्स, रुग्णांनी, ग्राहकांनी, घाऊक वितरक आणि रेग्युलेटरी अथॉरिटीनी तातडीने बंद करावा असे आदेश डीसीजीआयने दिले आहेत. या डायजीन जेल सिरपची निर्मिती फार्मा कंपनी अबॉड इंडीया करीत आहे.
डायजीन जेलचा वापर असुरक्षित होऊ शकतो. डॉक्टरांनी हे औषध आपल्या रुग्णांना सुचविताना सावध रहावे. या औषधाने काही साईड इफेक्ट झाल्यास त्वरीत लक्ष द्यावे असे म्हटले आहे. या औषधाने कोणत्याही रुग्णाला काही त्रास झाल्यास त्याचा रिपोर्ट त्वरित करावा असे डीजीसीएने म्हटले आहे.
नोटीसीत काय म्हटले
डीजीसीएच्या नोटीसीत म्हटले आहे की सुरुवातीला कंपनीने डायजीनच्या मिंट फ्लेवरची एक बॅच आणि ऑरेंड फ्लेवरची चार बॅच कंपनीने माघारी मागविल्या आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला जेलची चव कडू लागत असून जेलला सफेद रंग आणि विचित्र वास येत होता. यानंतर कंपनीने गोवा येथील कंपनीच्या फॅसिलीटी सेंटरमधून सर्व मिंट, ऑरेंज आणि मिक्स फ्लेवरच्या बॅच परत मागविल्या.
कंपनीचे काय म्हणणे
अबॉट इंडीयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की कंपनी स्वस्ताहून गोवा प्लांट निर्मित सिरपला बाजारातून मागे घेतले आहे. यासंदर्भात काही ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. चवीत आणि वासात बदलाच्या तक्रारी होत्या. रुग्णांच्या आरोग्याच्या काहीही तक्रारी नाहीत. डायजीनचे अन्य उत्पादन डायजीन टॅबलेट आणि स्टीक पॅकवर काही परिणाम नाही. कंपनीच्या अन्य प्लांटमध्ये तयार करण्यात आलेल्या जेलवर काही प्रभाव झालेला नाही. सध्याच्या मागणी पुरेसा साटा उपलब्ध आहे.