Diabetes and Frozen Shoulder: मधुमेही रुग्णांच्या ‘सांधेदुखी’ सह सूज उतरवण्यास प्रभावी उपाय; दहा उपाय केल्यानंतर विसराल तुमचे आजारपण!

सांधेदुखी अर्थात फ्रोझन शोल्डर ही एक समस्या आहे. ज्यामुळे खांद्याच्या सांध्यामध्ये कडकपणा, सूज आणि प्रचंड वेदना जाणवतात. त्याला अॅडहेसिव्ह कॅप्सुलिटिस असेही म्हणतात. खांद्याच्या सांध्याभोवतीच्या मांसपेशींमध्ये सूज आल्यावर ही समस्या दिसून येते. त्‍यामुळे ते ताणले जाऊन कडक होतात. या समस्येमध्ये वेदना सामान्य आहे.

Diabetes and Frozen Shoulder: मधुमेही रुग्णांच्या ‘सांधेदुखी’ सह सूज उतरवण्यास प्रभावी उपाय; दहा उपाय केल्यानंतर विसराल तुमचे आजारपण!
मुधेमह
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 2:34 PM

मुंबई : सांधेदुखी अर्थात फ्रोझन शोल्डर (Frozen shoulder) ही एक समस्या आहे. ज्यामुळे खांद्याच्या सांध्यामध्ये कडकपणा, सूज आणि प्रचंड वेदना जाणवतात. त्याला अॅडहेसिव्ह कॅप्सुलिटिस असेही म्हणतात. यासोबतच खांद्याच्या हालचालीवरही परिणाम होतो. त्यात सूज आल्याने दैनंदिन कामे (daily tasks) करणे कठीण होऊन बसते. फ्रोझन शोल्डर कसा होतो? सीताराम भारतीय इन्स्टिट्यूट आणि होली फॅमिली हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील वरिष्ठ ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन-डॉ. बिरेन नाडकर्णी, यांनी सांगितले की, खांदा हाडे, स्नायू आणि टेंडन यांचा बनलेला असतो. जेव्हा खांद्याच्या सांध्याभोवती असलेले कॅप्सूल जाड आणि घट्ट (Capsule thick and tight) होते तेव्हा ते खांद्याच्या हालचालीवर परिणाम करते. ज्यामुळे प्रचंड वेदनेसह अस्वस्थता येते. लक्ष न दिल्यास हळूहळू त्रास वाढत जातो. या समस्येच्या सुरवातीला खांदा हलवताना वेदना होतात. यानंतर, खांद्याच्या ऊतींमध्ये कडकपणा विकसित होतो, ज्यामुळे हालचालींमध्ये फरक पडतो.

  1. मधुमेह आणि फ्रोझन शोल्डरचा संबंध बर्‍याच प्रकरणांमध्ये, तुमचे वय जितके जास्त असेल तितका धोका जास्त असतो. तसेच, अनियंत्रित मधुमेहाची पातळी कोलेजनमध्ये बदल करू शकते. हे एक महत्त्वाचे प्रोटीन आहे जे तुमचे संयोजी ऊतक बनवते. त्यामुळे असे स्पष्टपणे म्हणता येईल की, मधुमेह असलेल्या लोकांना फ्रोझन शोल्डर विकसित होण्याची शक्यता जास्त असते.
  2. तीव्र खांदेदुखीचा धोका वास्तविक जेव्हा साखर कोलेजनशी जोडली जाते. तेव्हा ती चिकट होते. याव्यतिरिक्त, ते गतिशीलता मर्यादित करते आणि आपल्या खांद्याला कडक करते. यामुळे तुम्हाला सौम्य ते तीव्र वेदना जाणवतील. काही परिस्थितीमध्ये, आपला खांदा हलवणे अगदी अशक्य होते. पुरुषांपेक्षा महिलांना फ्रोझन शोल्डरचा त्रास जास्त असतो. तसेच 40 ते 60 वयोगटातील लोकांना याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
  3. फ्रोझन शोल्डरपासून प्रतिबंध डॉक्टर बिरेन नाडकर्णी यांनी सांगितले की, फ्रोझन शोल्डरचे निदान त्याच्या लक्षणांच्या आधारे केले जाऊ शकते. लक्षात ठेवा की, तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रित करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, आपल्या खांद्याच्या हालचाली कायम नेहमी सारख्या राखण्यासाठी नियमित स्ट्रेचिंग आणि शारीरिक व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे.
  4. फ्रोझन शोल्डर खांद्यावर उपचार हा त्रास झालेल्या व्यक्तीच्या सुरवातीच्या टप्प्यात डॉक्टर काही औषधे आणि विशेष व्यायाम सुचवतात. बहुतेक रुग्ण सुरवातीला नॉन-ऑपरेटिव्ह उपचारांचा पर्याय निवडतात. काही लोक सांध्यातील अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि गती वाढवण्यासाठी स्टेरॉईड इंजेक्शन्सची निवड देखील करतात. परंतु लक्षात ठेवा की, जर तुम्हाला मधुमेह असेल तर ते धोकादायकपणे उच्च मधुमेहाचे कारण बनू शकतात. त्यामुळे त्यातून निदान होण्यासाठी अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घ्या. जर तुम्हाला फायदा होत नसेल, तर ओपन कॅप्सूल रिलीज किंवा आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यासारख्या अधिक विस्तृत प्रक्रियेचा देखील अवलंब केला जाऊ शकतो.
  5. फ्रोझन शोल्डरला सामोरे जाण्याचे इतर मार्ग हे टाळण्यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवा. नियमितपणे व्यायाम करा आणि खांदे ताणून घ्या. वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधांचा वापर केला जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. फिजिओथेरपीच्या मदतीने तुम्ही तुमचा खांदा मजबूत करू शकता आणि त्याची गती वाढवू शकता. सुरुवातीच्या उपचारांनी आराम मिळत नसेल, तर शस्त्रक्रिया हा एक चांगला पर्याय असू शकतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.