जास्त लिंबू खाण्याचे तोटे तुम्हाला माहिती असायलाच हवे!
आपण पित असलेला लिंबाचा रस तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटणार नाही का? भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशनने सांगितले की, जर आपण गरजेपेक्षा जास्त लिंबू सेवन केले तर आपल्या शरीराचे काय नुकसान होऊ शकते.

जेव्हा कोरोना व्हायरसने जगभरात आपला प्रादुर्भाव दाखवायला सुरुवात केली तेव्हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जाऊ लागला, जेणेकरून आपण संसर्गापासून स्वतःचा बचाव करू शकू. यासाठी लोकांनी लिंबाचे सेवन वाढवले कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील लिंबाचे सेवन वाढवतात. आपण पित असलेला लिंबाचा रस तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटणार नाही का? भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशनने सांगितले की, जर आपण गरजेपेक्षा जास्त लिंबू सेवन केले तर आपल्या शरीराचे काय नुकसान होऊ शकते.
जास्त लिंबू खाण्याचे तोटे
- जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लिंबूपाणी प्यायले तर तुमचा घसा खराब होऊ शकतो कारण जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने घशात दुखणे आणि टॉन्सिल्सची समस्या उद्भवू शकते
- लिंबामध्ये भरपूर आम्लीय गुणधर्म असतात ज्याचा उपयोग दात स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु त्याच्या अतिवापरामुळे दात खराब देखील होऊ शकतात, कारण लिंबाचा रस दातांच्या संपर्कात आल्यास वरचा थर म्हणजेच इनेमल खराब करू शकतो. म्हणूनच, जर आपण लिंबापासून बनविलेले उत्पादन सेवन केले असेल तर आपण ताबडतोब दात घासणे टाळावे, नुसती पाण्याने चूळ भरावी.
- लिंबू हे पचन सुधारण्याचे साधन मानले जाते, परंतु जर आपण जास्त प्रमाणात लिंबूपाणी प्यायले तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. लिंबाच्या अतिसेवनामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स सारखे त्रास होऊ शकतात. आपली पचनसंस्था बिघडू शकते.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)