पोटच नाही तर मेंदूला सुद्धा इजा पोहोचवतात हे काही पदार्थ, जाणून घ्या आणि सावध व्हा !

Wrong food: चुकीची खानपान शैली, आहारपद्धती यामुळे आपल्या पोटावरच नाही तर मानसिक आरोग्य सुविधा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. आज आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे चवीला तर स्वादिष्ट असतात. या पदार्थांमुळे आपला मेंदू व पोट या दोघांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो.

पोटच नाही तर मेंदूला सुद्धा इजा पोहोचवतात हे काही पदार्थ, जाणून घ्या आणि सावध व्हा !
Junk-food
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 9:31 AM

मुंबई :  आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे पदार्थ खात( street food) असतात. आपण बाहेर गेल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये मोठ्या आवडीने वेगवेगळे पदार्थ खात असतो.हे पदार्थ जरी आपल्या चवीला स्वादिष्ट लागत असले तरी यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. बहुतेक वेळा चमचमीत, मसालेदार, तेलकट, मैदा युक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या पोटाचे आरोग्य बिघडते ( stomach infection) पण त्याच बरोबर आपल्या मेंदूचे आरोग्य सुद्धा बिघडण्याची शक्यता असते. तज्ञ मंडळी यांच्या मते, जेव्हा आपण बाहेरचे पदार्थ खात असतो अशावेळी आपल्या जिभेची चव तर भागते पण त्याच बरोबर नंतर अनेकदा मानसिक आरोग्य( mentaly health) सुद्धा ढासाळत असते. आपण जे काही पदार्थ खात असतो त्याची चव जिभेला कळत असते आणि ज्यावेळी चेतनाक्षमता जागृत होते, अशावेळी प्रत्येक पदार्थाची चव जिभेला कळते. जर तुमच्या जिभेला चव जाणवत नसेल तर अशा वेळी चिंता करण्याचे कारण आहे परंतु जर प्रत्येक वेळी तुम्ही जिभेचे चोचले म्हणजेच लाड पुरवत असाल तर हे भविष्यात धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया अश्या काही पदार्थांबद्दल जे खाणे भविष्यात धोकादायक ठरू शकते त्याबद्दल…

जंक फूड: आपल्यापैकी अनेक जण जंक फुड सेवन करत असतात. जंक फूड मध्ये रिफाइंड शुगर आणि फॅट ची मात्रा अधिक असते यामुळे आपल्या पोटालाच नाही तर मेंदूला सुद्धा भविष्यात त्रास होऊ शकतो. जर आपण सातत्याने बाहेरील जंक फूड सेवन करत असू तर यामुळे आपल्याला मानसिक रोग सुद्धा होऊ शकतो.

कॅफीन सकाळी उठल्यावर प्रत्येकाला चहा-कॉफी लागते. चहा व कॉफी शिवाय कधीतरीच आपल्या दिवस उगवत असतो परंतु आपल्याला सांगू इच्छितो की, चहामध्ये उपलब्ध असलेले कॅफिन हे आपल्या शरीरासाठी धोकादायक असते त्यामुळे आपल्या शरीरात ऍसिडिटी व गॅसची समस्या निर्माण होते त्याचबरोबर जास्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन केल्याने अनिद्रा ची समस्या देखील सतावते. तज्ञ मंडळींच्या मते आपल्याला मर्यादितच कॅफीन सेवन करायला हवे.

मिठाई

आपल्यापैकी प्रत्येकाला गोड पदार्थ खाणे आवडत असते. अनेकांची मिठाई, गोड पदार्थ किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ ही कमजोरी असते परंतु या गोड पदार्थांमध्ये उपलब्ध असणारी शुगर आपल्या शरीरासाठी हानी कारक असते पण त्याचबरोबर मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक मानले जाते यामुळे तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकते.जास्त गोड व मिठाई युक्त पदार्थ खाल्ल्याने भविष्यात डायबिटीस सारखे आजार होतात. अनेकदा शुगरचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्य व सुद्धा पाहायला मिळतो.

मीठ आपल्यापैकी अनेक जण अन्न पदार्थांची चव वाढवण्यासाठी मिठाचा सरासर वापर करत असतात. जर आपण जास्त प्रमाणामध्ये मिठाचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते व भविष्यात रक्त कमी होऊन आपल्याला अनेक समस्या सुद्धा उद्भवू शकतील. नेहमी शक्य तो प्रयत्न करा की आपण जे पदार्थ सेवन करणार आहोत त्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी किंवा मर्यादित असायला हवे,जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही.

अल्कोहोल

अल्कोहोल सेवनाचे दुष्परिणाम आपल्यापैकी अनेक जण जाणूनच आहात परंतु नेहमी मद्यपान केल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत असतो. एखादी व्यक्ती जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये मद्यपान करते, अशा वेळी त्या व्यक्तीला नेहमी ताण तणाव जाणवत असतो. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार ताण तणाव जाणवत असेल तर त्याची मानसिक स्थिती सुद्धा खालावत जाते.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या

Bhringraj Hair Oil : केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायी ठरते घरी बनवलेले भृंगराज तेल, एकदा अवश्य करा वापर!

कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा, तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.