कानाशी निगडीत ही काही लक्षणे जाणवताच चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमचे बहिरेपण येऊ शकते!
कधी चुकूनही बाहेर कानाची साफसफाई करू नये यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकते. जर कानामध्ये खाज येत असेल तर अशावेळी कोणतीही टोकेरी वस्तू कानामध्ये अजिबात घालू नये. कानामध्ये काही हालचाल जाणवत असेल तर अशा वेळी फक्त कापूस टाकून आपल्याला कान साफ करायला हवे.
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या अवयवांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. आपल्या शरीरातील कान अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. कानाच्या आधारे आपल्याला ऐकू येते. कान (Ears) आपल्या शरीरातील नाजूक अवयवापैकी एक आहे. कानाचा पडदा हा पातळ असतो. या पडद्याला जरासाही धक्का लागल्यास भविष्यात कानाचा पडदा फाटून आपल्याला कायमचे बहिरेपण येऊ शकते. आपल्याकडे अनेकदा काना संदर्भातील एखादी समस्या उद्भवल्यास त्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा समस्या वाढते तेव्हा त्यावर उपचार केले जातात परंतु असे अजिबात नाही करायला पाहिजे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कानासंबंधी छोट्या छोट्या समस्या जसे की कानातून पाणी येणे, खाज सुटणे, वेदना जाणवणे यासारख्या समस्या जरी तुम्हाला जाणवलेल्या तरी लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. जर या समस्येकडे आपण दुर्लक्ष केले तर भविष्यात गंभीर आजार देखील होऊ शकतात. अनेकदा कानांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने कानाचा पडदा (Ear Drums) फाटून जातो. डॉक्टर कमलजीत सिंह यांच्या मते, कधी ही बाहेर कुणाकडूनच कानाची साफसफाई करू नये यामुळे कानात इन्फेक्शन (Infection in ears) होऊ शकते. अनेकदा आपण रस्त्याच्या किनारी कान साफ करणारे व्यक्ती पाहतो, अशा प्रकारच्या व्यक्ती व्यक्तींचे कान साफ करत असतात परंतु जर आपण ज्या व्यक्तींकडे जाऊन आपल्या कामाची साफसफाई केली तर यामुळे भविष्यात आपल्याला कानांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
डॉक्टर यांच्या मते, कानामध्ये खाज सुटत असेल तर अशावेळी कोणतीही टोकेरी वस्तू किंवा कापूस कधीच टाकू नका. जर जास्तच प्रमाणामध्ये खाज येत असेल तर कानाचा जो बाहेरील भाग आहे तेथे कापूसच्या मदतीने तुम्ही काही वेळ कापूस आत मध्ये टाकून खाजेपासून सुटका मिळवू शकता. जर तुम्हाला कानामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल जाणवत असेल तर अशा वेळी हलगर्जीपणा न करता डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधायला हवा. घरगुती पद्धतीने कान बरा करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. जर कानातून एखाद्या द्रव्य पदार्थ म्हणजेच पू बाहेर पडत असेल तर अशा वेळी कान तज्ज्ञ डॉक्टरांची भेट अवश्य घ्या. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात गोंधळ गोंगाट आहे अशा ठिकाणी जास्त वेळ थांबू नये यामुळे सुद्धा कानाला इजा होऊ शकते. गाणे सुद्धा मोठ्या आवाजामध्ये ऐकू नये. जरी यापूर्वी कानामध्ये एखादी समस्या झाली असेल किंवा काना संबंधित काही त्रास झाला असेल तर प्रत्येक सहा महिन्यानंतर कानाची तपासणी आवश्यक करायला हवी.
ही काही लक्षणे अवश्य ओळखा
डॉक्टरांचे म्हणणे आहे की ,जर कानामध्ये वेदना होत असतील, कान जड वाटत असेल, कानामध्ये वारंवार खाज सुटत असेल तर अशा वेळी दुर्लक्ष अजिबात करू नका. जर तुम्हाला ऐकू येत नसेल, कधीकधी कानामध्ये सिटी वाजल्यासारखा भास होत असेल. तर ही सगळी लक्षणे कानामध्ये इन्फेक्शन झाले आहे याचे संकेत तुम्हाला देत असते. याशिवाय सर्दीकडे सुद्धा कधीच दुर्लक्ष करू नये. काना या संदर्भातील अधिकतर समस्या या सर्दीमुळे होत असतात म्हणूनच आपल्याला सर्दी होणार नाही याबाबत काळजी देखील घ्यायला हवी.
जर कमी ऐकू येत असेल तर
डॉक्टरांच्या मते, अनेकदा वाढत्या वयानुसार व्यक्तीला कमी ऐकू येते.आपल्या कानाची क्षमता कमी होत असते. अशा वेळी ही एक सर्वसाधारण बाब आहे परंतु जर तुमचे वय कमी असेल, तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला लवकर ऐकू येत नसेल तर अशावेळी ही बाब गंभीर आहे. जर तुम्हाला ऐकू येत नसेल, कान तुमचा नेहमी जड होत असेल तर अशा वेळी कानाची योग्य ती तपासणी करायला हवी.या सर्व घटनांमध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नये. त्वरित कानाच्या डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार करायला हवे.
कानातून पू बाहेर पडणे
बहुतेक वेळा आपल्या कानातून एखादा द्रव्य पदार्थ किंवा पू बाहेर पडत असतो, अशावेळी दुर्लक्ष अजिबात करू नये. अनेकांना ही समस्या सर्वसाधारण वाटत असते परंतु जर वारंवार कानातून पाणी येत असेल तर पांढरा पदार्थ म्हणजेच येत असेल तर डॉक्टरांना अवश्य भेट द्यायला हवी व डॉक्टरांनी सांगितलेले उपचार वेळेवर करायला पाहिजे, अन्यथा तुमच्या कानाच्या पडद्याला इजा पोहोचू शकते.
टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
इतर बातम्या
कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा, तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल!