कोरोनाकाळात दुसऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करु नका, कोणी जास्त काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

कोरोनाच्या या काळात लोक नॉन-कोविड आजारांबाबत बेफिकीर होत आहेत. तर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी जास्त संख्या जे आधीच गंभीर आजारांनी ग्रासलेले होते त्यांचीच होती.

कोरोनाकाळात दुसऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करु नका, कोणी जास्त काळजी घ्यावी? वाचा सविस्तर
CORONA AND DOCTOR
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 8:00 AM

मुबई : देशात कोरोना (Corona) व्हायरसच्या तिसऱ्या लाटेत बहुतेक लोकांचे लक्ष हे कोरोनापासून बचाव करण्यावर आहे. त्यासाठी लोक विविध खबरदारी घेत आहेत. यासोबतच ते रोगप्रतिकारशक्ती (health) मजबूत करण्यासाठी अनेक औषधांचा वापर करताहेत, परंतु कोरोनाच्या या काळात लोक नॉन-कोविड आजारांबाबत बेफिकीर होत आहेत. तर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी जास्त संख्या जे आधीच गंभीर आजारांनी ग्रासलेले होते त्यांचीच होती. दिल्ली, मुंबई आणि इतर अनेक मोठ्या शहरांमधील रुग्णालयांमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या मोठी त्यात ज्यांना किडनी, हृदय, यकृत आणि श्वसनाचे गंभीर आजार होते. त्यांच्यामध्ये असे काही लोक होते ज्यांना या गंभीर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि चाचणी दरम्यान ते कोविड पॉझिटिव्ह आढळले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टर काय सांगतात?

डॉक्टर असेही म्हणतात की इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. अशा परिस्थितीत, त्यांनी त्यांचा रोग वाढू न देणे आणि त्याच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी सर्व आवश्यक पावले उचलणे महत्वाचे आहे. विशेषत: हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. थंडीच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा वेळी हृदयरोग्यांनी आवश्यक औषधे सोबत ठेवावीत. याशिवाय तुम्ही नियमितपणे स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. कारण हृदयाशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या तुमच्यासाठी घातक ठरू शकते. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका लक्षणीय वाढतो. कर्करोगाच्या रुग्णांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. यासाठी त्यांनी त्यांची औषधे नियमित घेत राहणे आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे.

किडनीच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

मूत्रपिंडाची कोणतीही समस्या गंभीरपणे घेतली पाहिजे. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी त्यांची औषधे नियमित घ्यावीत. जर एखादी व्यक्ती डायलिसिसवर असेल तर त्याने नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. आहाराचीही काळजी घ्या. राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कोरोनापासून वाचण्यासाठी आपण सर्व उपाययोजना करत आहे, मात्र त्याचवेळी इतर रोगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

टीप-कोणतीही औषधे घेण्यापूर्वी तुमच्या नियमीत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Child health: लहान मुलांच्या डोक्याचा आकर का वाढतो ? काय आहे या आजारामागील कारण!!

‘हे’ पेय थकवा, कमजोरी सारख्या समस्येपासून ठेवते दूर; जाणून घ्या फायदे

हावर्ड हेल्थने सांगितल्या ‘या’ सात टिप्स… कोरोना जवळपासही फिरकणार नाही…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.