Vitamin E capsules : ‘व्हिटॅमिन ई कॅप्सूल’ वापताना तुम्हीही ‘या’ चुका करताय? जाणून घ्या योग्य पद्धत

व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरताना कोणत्या प्रकारच्या चुका करतात? आणि त्यामुळे काय नुकसान होते.

Vitamin E capsules : ‘व्हिटॅमिन ई कॅप्सूल’ वापताना तुम्हीही 'या' चुका करताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Vitamin E capsulesImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 2:57 PM

नवी दिल्ली : प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिची त्वचा चमकदार (Shiny skin) दिसावी आणि दीर्घकाळ तरूण राहावी. यासाठी बहुतांश महिला स्किन केअर रूटीन पाळतात. महिला बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य उत्पादनांचा देखील भरपूर वापर करतात, ही उत्पादने मोठ्या प्रमाणात रसायनांपासून बनवली जात असून, उत्पादनांमार्फत चांगले चमकणारी त्वचा आणि चमकदार त्वचेसाठी दावा केला जातो. परंतु ते सर्व तात्पुरते आहे. तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता, परंतु लोक यामध्येही चुका करतात. घरगुती सौदर्यं उपचार (Home Remedies) करण्यासाठी अनेक जन व्हीटॅमिन ई कॅप्सूलचा वापर (Use of Vitamin E Capsules) करण्यास प्राधान्य देतात. मात्र, व्हिटॅमिन ई शी संबंधित टिप्स फॉलो करताना लोक अनेक चुका करतात. त्या चुका त्वचेसाठी हाणीकारक ठरू शकतात. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले व्हिटॅमिन ई, त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते, परंतु त्याचा चुकीचा वापर केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

थेट त्वचेवर लावू नका

अनेक वेळा लोक चांगले परिणाम मिळविण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल थेट चेहऱ्यावर लावण्याची चूक करतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ही पद्धत अजिबात अवलंबू नये. त्वचारोग तज्ञांच्या मते, असे केल्याने त्वचेवर पिंपल्स बाहेर येऊ शकतात. तुम्ही ते त्वचेच्या प्रकारानुसार इतर सौंदर्य उत्पादनांमध्ये मिसळून लावू शकता.

हे सुद्धा वाचा

खूप वेळ त्वचेवर ठेऊ नका

व्हिटॅमिन ई कॅप्सूल अनेक गोष्टींमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावता येते, परंतु कोरफड जेल बरोबर व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरल्यास, त्याचे उत्तम परिणाम मिळू शकतात. तुम्ही हे दोन्ही घटक लावा, पण ते जास्त काळ त्वचेवर ठेवू नका. यामुळे त्वचेवर अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये त्वचेचा कोरडेपणा ही मोठी समस्या आहे.

फेस पॅकमध्य़े एकच कॅप्सूल वापरा

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असल्याचे सिद्ध होते. काही लोक फेस पॅकद्वारे चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळतात. तज्ञांच्या मते, एक वेळच्या फेस पॅकमध्ये एक कॅप्सूल पुरेसे आहे. होय, जर तुम्ही ते केसांसाठी वापरत असाल तर दोन कॅप्सूल वापरता येतील.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल कधीही गरम करू नका

त्वचा किंवा केसांची निगा राखण्यासाठी कोणताही प्रयोग चांगला मानला जात नाही. व्हिटॅमिन ई कॅप्सूल गरम केल्याने त्वचेवर मुरुम किंवा पुरळ येऊ शकतात. जर तुम्हाला असे करायचे असेल तर त्यासाठी प्रथम तज्ञांचा सल्ला घ्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.