रात्री गाढ झोप लागायला हवी असेल तर खा ‘हा’ एक पदार्थ, लागेल शांत झोप
कधी-कधी आपल्याला रात्रीच्या जेवणानंतरही भूक लागते. अशा वेळी इतर कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी अंडी खाल्ल्यास गाढ झोप तर लागेलच पण तणावही दूर होईल.
नवी दिल्ली – जर तुम्ही मांसाहार करत असाल तर पौष्टिकतेच्या दृष्टीने अंडी (eggs) हा एक उत्तम पदार्थ ठरू शकतो. बर्याचदा लोकांना नाश्त्यात अंडी खायला आवडतात, परंतु तुम्ही रात्रीच्या वेळीही अंडी खाऊन स्वतःला निरोगी ठेवू शकता. अनेक वेळा आपल्याला रात्रीच्या जेवणानंतरही भूक लागते. रात्रीचे जेवण करूनही रात्री भूक लागते. अशा वेळी आपण अनेकदा फास्ट फूड किंवा स्नॅक्स (fast food or snacks) खातो, जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर नसते. त्यापेक्षा रात्री भूक लागल्यावर इतर कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी अंडी खाणं हा उत्तम पर्याय असू शकतो. अंडी खाल्ल्यास गाढ झोप (sound sleep) तर लागेलच पण तणावही दूर होईल.
प्रोटीनयुक्त अंड्याचे पचनही सहज होते. रात्री अंडी खाल्ल्याने चांगली झोप येण्यास खूप मदत होते. जाणून घेऊया अंडी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात.
अंडी खाण्याचे फायदे
1) चांगली झोप लागते – जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर अंडी खाल्ल्याने तुमची झोप सुधारते. अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन झोप सुधारण्यास मदत करते. अशा परिस्थितीत रात्री स्नॅक्स म्हणून अंडी खाणे चांगला पर्याय ठरतो.
2) ब्लड शुगर नियंत्रणात राहते– रात्री भूक लागल्यावर तुम्ही फास्ट फूड किंवा इतर कोणताही बेक्ड स्नॅक्स खाल्ले तर त्यामुळे तुमची रक्तातील साखर वाढू शकते. पण अंडी खाल्ल्यास ते रक्तातील साखर वाढू देत नाही. रक्तातील साखर नियंत्रित राहिल्याने तुम्हाला गाढ झोप येण्यास मदत होईल.
3) स्नायूंसाठी फायेशीर – पर्ड्यू युनिव्हर्सिटी आणि सायन्स डेली यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की रात्री झोपण्यापूर्वी अंडी खाल्ल्याने झोपेच्या वेळी मसल प्रोटीन सिंथेसिस वाढते. हे तुम्हाला स्नायू मजबूत आणि चांगले बनवण्यात खूप मदत करते.
4) पचायला सोपे – जर तुम्हाला रात्री अनेकदा भूक लागत असेल आणि तुमची पचनशक्ती कमजोर होत असेल तर अंडी खाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, झोपण्याच्या काही मिनिटांपूर्वी काहीही खाऊ नये. जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही कडक उकडलेल्या अंड्यांऐवजी स्क्रॅम्बल्ड अंडी खाऊ शकता, जे पचायला सोपे असते.
5) स्ट्रेस कमी होतो – चांगल्या व शांत झोपेमुळे तुमचा तणाव दूर होण्यासही मदत होते. अंड्यामध्ये असलेला पांढरा व पिवळा बलक यामध्ये भरपूर पोषक तत्वं आणि अँटिऑक्सिडेंट असतात जे झोप सुधारतात. निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांना नियमित अंडी खाल्ल्याने चांगली झोप येते. दीर्घ आणि गाढ झोप तणाव कमी करण्यास खूप मदत करते.