मायक्रोवेव्हमध्ये अन्न 1 मिनिटांत गरम तर होतं; पण त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची लिस्ट तर वाचा….
Microwave Cooking : मायक्रोवेव्हमुळे अन्न लवकर गरम होण्यास मदत होत असली तरी त्याचे काही तोटे देखील आहेत ज्यांची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : आजकाल बहुतेक लोक अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन (microwave oven) वापरू लागले आहेत. कारण ओव्हन फक्त अन्न पटकन गरम करत नाही, तर त्यामध्ये पिझ्झा आणि केक यांसारखे अवघड पदार्थही चांगले बनतात.. या वेगवान जगात मायक्रोवेव्हने लोकांसाठी अनेक कामे सोपी (easy work) केली आहेत यात काहीच शंका नाही. केवळ घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही पदार्थ बनविण्यासाठी किंवा प्रक्रिया करण्यासाठी हमखासपणे मायक्रोवेव्हचा उपयोग केला जातो.परंतु कोणत्याही गोष्टीचे केवळ फायदेच नसतात, त्यासोबत काही तोटेही (side effects) असतात. त्यामुळे हानीसुद्धा होऊ शकते. मायक्रोवेव्हच्या बाबतीतही असंच काहीसं आहे.
मायक्रोवेव्हमुळे अन्न लवकर गरम होण्यास मदत होत असली तरी त्याचे काही तोटे देखील आहेत ज्यांची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे. कारण हे नुकसान तुमच्या जीवावर बेतू शकते. प्रत्येक पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे टाळायला हवे. पदार्थातील पोषकतत्वे त्यामुळे संपुष्टात येतात. अनेक जण आपले जेवण बनवण्यापासून ते गरम करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी मायक्रोवेव्हचा वापर करताना दिसतात. यामुळे काम खूप सोपे होत असले तरी हे कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते, असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मायक्रोवेव्ह ओव्हन मधून देखील आपला मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरप्रमाणेच रेडिएशन उत्सर्जित होतात. तसेच मायक्रोवेव्हमध्ये मांस आणि दूध गरम केल्याने त्यामध्ये कार्सिनोजेन्स तयार होऊ लागतात, ज्यामुळे कर्करोगासारखे धोकादायक आजार होण्याचा धोका वाढतो. इतकंच नव्हे तर मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने अन्नातील पोषकतत्त्वे खराब होतात. ओव्हनमध्ये अन्नपदार्थ तर गरम होतात, पण ते अन्न तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यापूर्वी जेवढे पोषण देऊ शकत होते, तेवढे मात्र पुरवू शकणार नाही.
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात. मात्र, काही टिप्स वापरून तुम्ही अन्नाचे होणारे नुकसान काही प्रमाणात कमी करू शकता.
1) तुम्ही अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरू शकता. पण त्यात स्वयंपाक करणे किंवा एखादा पदार्थ पूर्णपणे त्यात शिजवणे टाळावे. तसेच अन्न जास्त वेळासाठी आणि जास्त वेळा गरम करणे टाळावे.
2) मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करत असताना त्यापासून नेहमी किमान 2 फूट लांब अंतरावर उभे रहावे.
3) अन्नपदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर अगदी कमी वेळ करावा किंवा शक्यतो मायक्रोवेव्ह वापरूच नये. कारण ते अन्नातील पोषण हिरावून घेते आणि त्याची चव काही प्रमाणात बदलते. अन्नातून जास्तीत जास्त पोषणमूल्ये मिळवायची असतील तर मायक्रोवेव्हऐवजी पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक करा.