आजार अनेक उपाय एक! जिऱ्याचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?
जिरे (Cumin seeds) हा एक लोकप्रिय मसाल्याचा पदार्थ आहे. भारतामध्ये जवळपास सर्वच पदार्थांमध्ये जिऱ्याचा उपयोग होतो. जिऱ्यामुळे स्वयंपाक चविष्ट होतोच, सोबतच जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) देखील आहेत त्यामुळे जिऱ्याला आयुर्वेदामध्ये (Ayurveda) खूप महत्त्व आहे.
जिरे (Cumin seeds) हा एक लोकप्रिय मसाल्याचा पदार्थ आहे. भारतामध्ये जवळपास सर्वच पदार्थांमध्ये जिऱ्याचा उपयोग होतो. जिऱ्यामुळे स्वयंपाक चविष्ट होतोच, सोबतच जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) देखील आहेत त्यामुळे जिऱ्याला आयुर्वेदामध्ये (Ayurveda) खूप महत्त्व आहे. जिऱ्याच्या नियमित सेवनामुळे होणाऱ्या अनेक फायद्यांची माहिती आयुर्वेदात सांगितली आहे. जिऱ्यांच्या नियमित सेवनामुळे आपल्याला अनेक आजारांपासून कायमची सुटका मिळू शकते. जिऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह याशिवाय अन्य अनेक पौष्टिक तत्वे असतात. ज्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी होतो. पोटाच्या विविध आजारांसाठी जिऱ्याचे सेवन हा रामबाण इलाज मानला जातो. ज्या व्यक्तींना पोटाच्या समस्या आहेत अशा व्यक्तीने जिऱ्याचे नियमित सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. आज आपण जिऱ्याच्या अशाच काही उपयांबाबत जाणून घेणार आहोत.
पचनाशी संबंधित समस्या
जर एखाद्या व्यक्तीला पचन, दररोज गॅस, अॅसिडिटी, आंबट ढेकर येणे इत्यादी समस्या असतील तर त्याने रात्री झोपण्यापूर्वी नियमित जिऱ्याचे सेवन करावे. जिरे भाजून ठेवावे व रात्री बारीक चावून खावेत. त्यानंतर वरून कोमट पाणी प्यावे. असे नियमित केल्यास तुमची पच शक्ती वाढून गॅस अॅसिडिटी सारख्या समस्या दूर होतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जिऱ्याचे नियमित सेवन हे हृदयासाठी देखील उपयुक्त आहे. जिऱ्याच्या नियमित सेवनामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी नियंत्रणात राहाते. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहिल्याने हृदययाशी संबंधित विविध आजारांचा धोका कमी होतो. झोपण्यापूर्वी नियमित जिऱ्याचे सेवन करावे.
पाठदुखी पासून आराम मिळण्यासाठी
तुम्हाला जर सतत पाठदुखीचा त्रास होत असेल तर जिरे हे पाठदुखीवर देखील रामबाण इलाज आहेत. रोज रात्री झोपण्यापूर्वी भाजलेल्या जीऱ्याचे कोमट पाण्यासोबत सेवन करा. जिऱ्याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळेल.
चांगल्या झोपेसाठी
अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. तुम्हालाही ही समस्या असेल तर झोपण्यापूर्वी जिरे खाल्ल्यास चांगली झोप येण्यास मदत होते.
टीप : वरील माहिती ही सामान्यज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. कुठेलेही औषधोपचार घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
संबंधित बातम्या
चेन्नईला जाण्याचे नियोजन आहे; मग या पर्यटन स्थळांना आवश्य भेट द्या
झोपण्यापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, शरीराला होईल मोठे नुकसान…
आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होईल मदत