AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा…

मद्यप्राशन केल्याने थंडी वाजत नाही हे सत्य आहे का ? थंडीत मद्य पिण्याचे धोके काय आहेत ? कारण अनेकजण थंडीत उष्णता येण्यासाठी मद्यप्राशन करण्याचा सल्ला देत असतात, परंतू तज्ज्ञांचे यावर काय मत आहे ?

दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा...
| Updated on: Nov 05, 2025 | 6:31 PM
Share

थंडीत नेहमी ड्रींक घेण्याने थंडी पळून जाईल असा सल्ला दिला जात असतो. परंतू मद्यामुळे खरंच थंडी गायब होते का? की हा केवळ भ्रम आहे. तज्ज्ञांचे यावर मत काय आहे ? दारु प्यायल्यानंतर जे आपल्या गरम झाल्यासारखे वाटत असते ते केवळ अस्थायी स्वरुपाचे असते. वास्तविक शरीराचे तापमान घटत असते. त्यामुळे दारु थंडीपासून वाचवत नाही तर थंडीसंदर्भात आणखीन संवेदनशील बनवत असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गंभीर प्रकरणात यामुळे हायपोथर्मियाची ( शरीराचे तापमान अचानक कमी होणे ) सारखी जीवघेणी स्थिती तयार करु शकते. भारतातील उत्तरेकडील राज्यात जेथे तापमान उणे ५-१० डिग्री सेल्सियस पर्यंत घसरते.

दारु शरीरात गेल्यानंतर रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यामुळे रक्त त्वचेच्या पृष्ठभागापर्यंत पोहचते आणि आपल्या गरम झाल्यासारखे वाटते.परंतू यावेळी शरीराचे कोअर तापमान घटू लागते कारण गरम रक्त शरीराच्या आतील भागातून बाहेरील बाजूस आलेले असते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

त्यामुळे दारु प्यायल्याने शरीराला जरी गरम वाटत असले तरी शरीराच्या आतील थंडी वाढते. दारु शरीराची हुडहुडी भरण्याची प्रतिक्रीया देखील दाबून टाकते.वास्तवित शरीरात नैसर्गिक गरमी निर्माण करण्याची ती प्रक्रीया असते.

उष्णता असो, पावसाळा असो की थंडी दारु प्रत्येक मोसमात शरीराला तेवढेच नुकसान पोहचवते. अल्कोहल हे डाययुरेटिक असते त्याने युरिनची फ्रीक्वेन्सी वाढते. अशात थंडीत तहान कमी लागत असताना आणि डीहायड्रेशन वेगाने होते. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रण बिघडते.

दारुमुळे हार्ट रेट अस्थायी रुपाने वाढू शकतो. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हा खास करुन त्या लोकांसाठी जास्त धोकादायक असतो ज्यांना आधीच हार्ट डिसीज आहे.दारु मेंदू सुन्न करते. ज्यामुळे थंडीचे सिग्नल्स ( थरथरणे ) जाणवत नाहीत. थंडीत त्यामुळे अल्कोहलची नशा वेगाने चढते, काण बॉडी हीट लॉसमुळे एब्जॉब्शर्न वाढते.

थंडीत दारु पिण्याचे काय धोके ?

दारुने शरीराती आतील उष्णता त्वचेच्या पृष्ठभागावर येते. त्यामुळे थंड हवेत गरम वाटू लागते. त्यामुळे शरीराचे खरे तापमान घटू लागते. याचा परिणाम हार्टवर ताण, डीहायड्रेशन आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो असे डॉ.रोहीत शर्मा यांचे म्हणणे आहे.

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑन अल्कोहल एब्यूज एंड अल्कोहलिज्म (NIAAA) च्या मते थंडीत मद्य प्राशन केल्याने हायपोथर्मियाचा धोका वाढतो. थंडीत दारुने रक्त त्वचेकडे गेल्याने हार्ट, लंग्स आणि ब्रेन या अवयवात उष्ण रक्ताची कमतरता जाणवते. यामुळे शरीराचे तापमान हळूहळू कमी होते. ज्यास हायपोथर्मिया म्हटले जाते. ही स्थिती जीवघेणी होऊ शकते. ज्यांना आधीपासूनच हार्ट वा ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांच्यासाठी अधिक धोका आहे. थंडीत मद्य पिल्याने लोक जॅकेट किंवा स्वेटर काढून टाकतात, कारण त्यांना लगेच गरम होते, परंतू या चुकीमुळे शरीराचे तापमान घसरुन हायपोथर्मियाचा धोका वाढतो.

डिहायड्रेशनची रिस्क –

दारु डाययुरेटिक असल्याने वारंवार लघवी येते. ज्यामुळे शरीराचा फ्लईड बॅलन्स बिघडतो. तसेच थंडीत तहान कमी लागत असल्याने ड्रीहायड्रेशन आणि टेम्परेचर कंट्रोल दोन्ही बिघडून जाते. त्यामुळे शरीराची थंडीशी लढण्याची क्षमता कमी होते.

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची रिस्क

थंडीत दारु प्यायल्याने शरीराच्या आतील तापमान घटू लागते. त्याने ब्लड प्रेशर आणि हार्ट रेटमध्ये अचानक बदल होतो, त्यामुळे हार्टवर अतिरिक्त दबाव वाढतो. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.