ह्रदय विकाराच्या झटक्याचे बळी व्हायचे नाहीये..? मग…या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; तुमच्या आरोग्याबाबत वेळीच करा उपाय योजना!

हृदयविकार :. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही महत्त्वाचे बदल सुरू होतात. हदयविकाराच्या झटक्या पुर्वी आपले शरीर काही ठरावीक संकेत देतो. ते वेळीच ओळखणे महत्वाचे असून दक्षता घेतल्यास प्राण हानी टाळता येणे सहज शक्य आहे.

ह्रदय विकाराच्या झटक्याचे बळी व्हायचे नाहीये..? मग...या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; तुमच्या आरोग्याबाबत वेळीच करा उपाय योजना!
Heart disease,
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 7:31 PM

हृदयविकाराचा झटका (Heart attack) हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारणापैकी एक आहे. बदलत्या जिवनशैलीचा परिणाम म्हणून, आता, जवळजवळ प्रत्येक कुटुंबातच हृदयरोगी आढळतात. आजवर तरुणांना हा आजार होत नव्हता..मात्र, अत्याधुनीक जिवनशैलीमुळे (sophisticated lifestyle) तरुणांनाही हदयविकाराचा धेाका वाढला आहे. हदयविकाराच्या झटक्या प्रसंगी वयोवृद्धांच्या अवस्था पाहून घाबरून जाणे सहाजीक आहे. मात्र, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्ही सावध होणे आणि ते टाळण्यासाठी उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. बहुतांश हृदयविकार प्राणघातक ठरू शकतो, त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही महत्त्वाचे बदल होऊ लागतात. हदयविकाराच्या झटक्या पुर्वी आपले शरीर काही ठरावीक संकेत (Certain hints) देत असते. ते वेळीच ओळखणे महत्वाचे असून दक्षता घेतल्यास प्राण हानी टाळता येणे सहज शक्य आहे.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

हृदयाचे आजार खूप गंभीर आहेत, त्यामुळे जर तुमच्या शरीरात काही विशेष बदल दिसू लागले तर ते धोक्याचे संकेत समजा आणि त्याकडे दुर्लक्ष मुळीच करु नका, अन्यथा तुमची निष्काळजी वृत्ती घातक ठरू शकते.

1)चेस्ट पेन- छातीत दुखणे

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, छातीत कळ येते..आणि अस्वस्थता वाटू लागते. छातीत दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु हृदयविकाराच्या रुग्णास संभवणारे लक्षणांकडे दुर्लक्ष करणे घात आहे. जर तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असतील तर, तुम्ही ताबडतोब तपासणी करून घ्यावी.

हे सुद्धा वाचा

2) असामान्य घामाच्या धारा

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, काही लोकांना पूर्ण एसी रूममध्येही दरदरुन घाम फुटतो. खरे, तर हे एका मोठ्या धोक्याचे लक्षण आहे. सहसा, अशी समस्या हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी उद्भवते, म्हणून आपल्या आरोग्याबद्दल सतर्क रहा.

३)पाठीतील वेदना

सहसा तिव्र हदय विकाराचा झटका येण्यापुर्वी जसे छातीत दुखू लागते. अगदी तसेच काही वेळा डावा हात जड होतो..नंतर हळू हळू खांद्याच्या पाठीमागे वेदनेची कळ उठते. याकडे सहसा हदयरोगी दुर्लक्ष करतांना दिसुन येतात. बाम लावून किंवा वेदनाशामक गोळ्या खावून वेळ मारुन नेली जाते. नेमकी हिच वेळ हदय रोग्यासाठी (गोल्डन अवर) महत्वाची असते. अन्यथा झोपेत तीव्र झटका येवुन उपचारापुर्वीच रुग्ण दगावतो. म्हणून, दुखण्याला दुर्लक्षीत करु नका.

4) थकवा

कोणतेही कष्ट किंवा काम न करता थकणे देखील हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असु शकते. जेव्हा कोलेस्टेरॉलमुळे हृदयाच्या धमन्या बंद होतात किंवा अरुंद होतात तेव्हा हृदयाला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे माणुस लवकरच थकतो. अशा परिस्थितीत, रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही अनेक वेळा तुम्हाला सुस्ती आणि थकवा जाणवतो आणि दिवसाही झोपेची किंवा विश्रांतीची गरज भासते.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.