Dr ravi Godse चीनमधून Corona येतोय? डॉ.रवी गोडसे यांचा धक्कादायक नाही, दिलासादायक सल्ला
लोक घाबरले आहेत कारण हाच कोरोना ३ वर्षांपूर्वी चीनमध्ये धडकला होता. तेव्हा भारतात अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती, तर काही जण दगावले होते.यानंतर लसी आल्या आणि अनेकांना आधार मिळाला, पुन्हा कोरोनाला लोक विसरले, पण कालच्या बातमीने पुन्हा धास्तावले.
मुंबई : चीनमधून कोरोना येत असल्याच्या बातम्या कालपासून मीडियावर धडकत आहेत, चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. काही व्हीडिओंमध्ये दवाखाने फूल असल्याचं चित्र आहे, तर काहीजण खाली झोपून उपचार घेत आहेत. पुन्हा कोरोना येणार का, तोच हाहाकार पुन्हा भारतात उडणार का, असा प्रश्न लोकांना पडला आहे. यावर डॉ.रवी गोडसे यांनी मात्र दिलासादायक सल्ला दिला आहे. लोक घाबरले आहेत कारण हाच कोरोना ३ वर्षांपूर्वी चीनमध्ये धडकला होता. तेव्हा भारतात अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती, तर काही जण दगावले होते.यानंतर लसी आल्या आणि अनेकांना आधार मिळाला, पुन्हा कोरोनाला लोक विसरले, पण कालच्या बातमीने पुन्हा धास्तावले.
मात्र डॉ.रवी गोडसे यांनी या कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नसल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे, डॉ.रवी गोडसे म्हणतात, “अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला समोर जा, एखाद्या गुराला ३ महिन्यापासून बांधून ठेवलं तर तो जोर दाखवणारंच ना. आणि यापूर्वी आपण त्याचा सामना केला आहे, भारतीयांना तेवढी काही घाबरण्याची गरज नाही, आपण लसी घेतल्या आहेत, एक काय, दोन काय आणि तीन डोस घेऊन झाले आहेत, मग घाबरण्याची गरज नाहीय.”
डॉ.रवी गोडसे कोरोनावर आणखी पुढे म्हणतात, “काहीही होणार नाही,काहीही करु नका, सर्व काही करुन झालं आहे, म्हणून चीनमधून येणाऱ्या या कोरोनाला घाबरण्याची गरज नाही.तुम्ही म्हणाल चीनमध्ये तर भयानक चित्र आहे, लोकांना बेड मिळत नाहीत, अहो, ते सोडून द्या तो चीन आहे, त्यांची लोकसंख्या किती, तुम्ही कशाला काळजी करतायत, झालंय.आपलं कोरोनाशी दोन हात करुन.”
“आता येत राहणार तो अधूनमधून, पुन्हा पुन्हा नको त्याचे एवढे लाड करायला, तो एवढा काही भयानक रुप दाखवणार नाही.त्यामुळे भारतीयांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही, उड्या मारा अगदी. अजिबात कोरोना येतोय म्हणून ताण घेऊ नका”, असा सल्ला डॉ.रवी गोडसे यांनी दिला आहे.