Monkeypox : मंकीपॉक्स का होतो? कारण समोर! वाचा नेमकं काय म्हणाले डॉ. तरुण साहनी?
एएनआयने नुकताच एक ट्विट केले आहे, त्यामध्ये अपोलो हॉस्पिटलचे डॉ. तरुण के साहनी यांनी मंकीपॉक्ससारख्या संसर्गजन्य आजारामध्ये मोठे विधान केले आहे. साहनी म्हणाले की, मंकीपॉक्स भारतामध्ये रोखण्यासाठी सरकारकडून खूप चांगली पाऊले उचलली जात आहेत. विशेष म्हणजे मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी लोक देखील खबरदारी घेत आहेत.
मुंबई : कोरोना (Corona) ओसरल्यानंतर आता जगातील काही देशांमध्ये मंकीपॉक्स या आजाराने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा दोन वर्षांतील कहर आता कुठे संपला होता. मात्र, लगेचच मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराने पाय पसरवण्यास सुरूवात केलीये. मंकीपॉक्स (Monkeypox) हा आजार युरोपीय देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये अद्याप एकही मंकीपॉक्सचा रूग्ण सापडलेला नाही. मुंबई महापालिकेकडून तर मंकीपॉक्सचा संसर्ग असलेल्या देशामधून आलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करूनच सोडले जात आहे. यासाठी महापालिकेचे आरोग्य विभागाचे पथक विमानतळावर (Airport) कार्यरत आहे.
डॉ. तरुण के साहनी यांचे मोठे विधान
मुंबईमध्ये खबरदारी म्हणून मंकीपॉक्ससाठी एक स्वतंत्र वाॅर्ड देखील तयार करण्यात आला आहे. एएनआयने नुकताच एक ट्विट केले आहे, त्यामध्ये अपोलो हॉस्पिटलचे डॉ. तरुण के साहनी यांनी मंकीपॉक्ससारख्या संसर्गजन्य आजाराबद्दल मोठे विधान केले आहे. साहनी म्हणाले की, मंकीपॉक्स भारतामध्ये रोखण्यासाठी सरकारकडून खूप चांगली पाऊले उचलली जात आहेत. विशेष म्हणजे मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी लोक देखील खबरदारी घेत आहेत. मात्र, असे आजार बहुतेक वेळा प्रवासी देशात आणतात. मग त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. हा आजार रोखला जाईल आणि भारतात ते दिसणार नाही असेही डॉ. साहनी म्हणाले.
मंकीपॉक्सची ही प्रमुख लक्षणे
मंकीपॉक्स हा आजार संसर्गजन्स असल्यामुळे धोका अधिक आहे. मंकीपॉक्समध्ये रूग्णांची भांडे, कपडे, अंथरूण, पांघरूण किंवा रूग्णाने वापरलेली कोणतीही गोष्ट आपण वापरली तर आपल्याला मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो. मंकीपॉक्समध्ये हातावर किंवा अंगावर मोठी फोड येतात. तसेच मंकीपॉक्समध्ये हलका ताप आणि अंगावर पुरळ देखील येते. अर्जेंटिनामध्ये मंकिपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. हा रुग्ण स्पेनवरुन परतला होता. त्याच्या अगोदरच अफ्रिकेतून दुबईत आलेल्या एका महिलेलाही मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले होते.
पाहा ट्विटमध्ये नेमके काय म्हणण्यात आले आहे
Such diseases mostly brought into country by travellers. Govt &medical fraternity are well prepared. People taking precautions to prevent it. We hope that the disease will get arrested& we’ll not see any of it in India: Dr Tarun K Sahni, Indraprastha Apollo hospital, on monkeypox pic.twitter.com/og3cIBBLNa
— ANI (@ANI) May 31, 2022
विमानतळावरच तपासणी
मे महिन्यात मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण स्पेनमध्ये सापडले आहेत. यासोबतच मंकिपॉक्सचे रुग्ण हे बेल्जियम, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि अमेरिकेतही सापडले आहेत. यामुळेच वरील देशातून येणाऱ्या रूग्णांची तपासणी ही विमानतळावरच केली जाती आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने लोक त्रस्त झाली होती. आता कुठे कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आणि कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले. यामुळे सर्वांचे जीवन परत एकदा सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे.