मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बाराही महिने नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिऊन आपण निरोगी जीवन जगू शकतो. दिवसभरात एक नारळ पाणी पिले तर दिवसभर पाण्याची कमतरता अजिबात भासत नाहीत. यामुळेच या हंगामामध्ये नारळ पाणी पिणे खूप जास्त फायदेशीर (Beneficial) ठरते. असे म्हणतात की, एक सलाईन आणि एक नारळ पाणी एक सारखेच काम करतात. एक सलाईन घेतल्याने आपल्या शरीराला जितकी ऊर्जा (Energy) मिळते, तेवढीचे ऊर्जा आपल्याला नारळ पाणी पिल्याने मिळते. नारळ पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याच्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.
नारळाच्या पाण्याचे सेवन करून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांमुळे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात आणि यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नारळ पाण्यामध्ये लिंबू मिक्स करूनही घेऊ शकता.
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारही दूर राहतात. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी मर्यादित प्रमाणात नारळ पाणी प्यावे. वजन कमी करायचे असेल तर नारळाचे पाणी प्या. कारण त्यात चरबी फारच कमी असते. तसेच ते प्यायल्यानंतर पोटही बराच काळ भरलेले राहते. यामुळेच ज्यांना आपले वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये नारळाच्या पाण्याचे सेवन करावे.
उन्हाळ्यात पोट बिघडणे किंवा पोटाशी संबंधित समस्या जास्त प्रमाणात निर्माण होतात. तळलेले आणि भाजलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यावर अपचन, अॅसिडीटी आणि इतर समस्या त्रासदायक ठरतात. बाहेरचे अन्न टाळा आणि दिवसातून एकदा थंड नारळपाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे तुमची भूक वाढेल, याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होणार नाही.
संबंधित बातम्या :
Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!