Plastic Straw ने पिता नारळपाणी ? ही चूक टाळा, शरीरासाठी ठरते हानिकारक

बरेच जण नारळपाणी किंवा शहाळ्याचं पाणी पिताना प्लास्टिकच्या स्ट्रॉचा वापर करतात. मात्र त्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

Plastic Straw ने पिता नारळपाणी ? ही चूक टाळा,  शरीरासाठी ठरते हानिकारक
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 1:28 PM

नवी दिल्ली – नारळपाणी किंवा शहाळ्याचं पाणी पिणं (coconut water) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं हे तर तुम्हाला माहीत असेलंच. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण आवडीने नारळपाणी पितात. कोणी व्यक्ती आजारी (sick) असेल किंवा लवकर बरं होण्यासाठी नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. बरेच जण शहाळ्याचं पाणी पिताना प्लास्टिकच्या स्ट्रॉचा (plastic straw) वापर करतात. मात्र यामुळे आपल्या आरोग्याचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. प्लास्टिकच्या स्ट्रॉचा वापर केल्यामुळे (side effects of plastic straw)आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

प्लास्टिकची स्ट्रॉ वापरण्याचे दुष्परिणाम

प्लास्टिकच्या गोष्टी या अनेक हानिकारक केमिकल्सनी बनलेल्या असतात. पाणी पिण्यासाठी वापरली जाणारी स्ट्रॉ हीसुद्धा प्लास्टिकचीच बनलेली असते. जेव्हा हे प्लास्टिक उष्णतेच्या संपर्कात येते, तेव्हा त्यातील केमिकल्स वितळतात व नारळ पाणी पिताना ते (केमिकल्स) आपल्या शरीरात जातात. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. याचा आपल्या हार्मोन्सवरही वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच आरोग्यासंदर्भातील इतरही अनेक समस्या उद्भवण्यास ते कारणीभूत ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

दात होतात खराब प्लास्टिकची स्ट्रॉ वापरून नारळपाणी किंवा इतर कोणताही द्रव पदार्थ प्यायल्याने (त्या) प्लास्टिकमधील धोकादायक कंपाऊंट्सचा आपले दात आणि एनामलला स्पर्श होतो. यामुळे दातांचे नुकसान होऊन कॅव्हिटी होण्याचा धोका वाढतो. यामुळे दात खराब होतात तसेच ते कमकुवत होण्याची शक्यता असते. परिस्थिती गंभीर झाल्यास दातांमध्ये असह्य वेदनाही होऊ शकतात.

प्लास्टिकच्या स्ट्रॉने आपण जेव्हा नारळपाणी अथवा इतर द्रव पदार्थांचे सेवन करतो तेव्हा तो (द्रव) जोरात खेचून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपल्या ओठंवर विपरीत परिणाम होऊन ओठांचे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुम्ही प्लास्टिकच्या स्ट्रॉने नारळपाणी किंवा इतर एखादा ज्यूस अथवा द्रव पदार्थ पीत असाल, तर आजच ही घातक सवय सोडवा आणि आरोग्याचे नुकसान थांबवा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.