दररोज ग्रीन टी प्यायल्याने होऊ शकते लिव्हरचे नुकसान ? जाणून घ्या सत्य

ग्रीन टी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. असे मानले जाते की ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते. मात्र याचे अतिसेवन करणे हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते.

दररोज ग्रीन टी प्यायल्याने होऊ शकते लिव्हरचे नुकसान ? जाणून घ्या सत्य
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 11:04 AM

नवी दिल्ली – बहुतांश लोकांची सकाळ ही चहाशिवाय अधुरी असते. काहींना दुधाचा चहा आवडतो तर काही लोक लेमन टी किंवा ब्लॅक टी पिणे पसंत करतात. मात्र काही व्यक्तींना ग्रीन टी (green tea) प्यायचीही आवड असते. विशेषत: तुम्हाला वजन कमी करायचे (weight loss) असेल तर ग्रीन टी पिणे फायदेशीर समजले जाते. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. मात्र प्रत्येक गोष्ट एका ठराविक प्रमाणात केली तर ती योग्य ठरते, अन्यथा त्यामुळे नुकसान होण्याचीच शक्यता जास्त असते. ही बाब ग्रीन टी साठीही लागू होते. दररोज अथवा गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्यास त्याचे दुष्परिणाम (side effects of green tea)होतात, अशी माहिती समोर आली आहे. ग्रीन टीमुळे आपले यकृत म्हणजेच लिव्हरचेही नुकसान होऊ शकते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ग्रीन टीमुळे होऊ शकते लिव्हरचे नुकसान?

ग्रीन टीमध्ये अनेक पोषक तत्वं, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासारखे आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. ग्रीन टीचे सेवन करणे हे हृदयाचे आरोग्य आणि मधुमेह इत्यादींसाठी देखील फायदेशीर मानले गेले आहे. मात्र, एका अभ्यासानुसार, दररोज ग्रीन टी पिणे किंवा त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे हे आपल्या लिव्हरसाठी (यकृच) हानिकारक असू शकते. या अभ्यासानुसार, ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट (Epigallocatechin Gallate) नावाचे एक कॅटेचिन आहे, जे लिव्हरसाठी हानिकारक मानले जाते. म्हणूनच दररोज ग्रीन टी पिणे किंवा ग्रीन टीचे अतिसेवन करणे यामुळे लिव्हरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच लिव्हरशी संबंधित समस्या वाढू शकतात अथवा लिव्हर डॅमेजही होऊ शकते. मात्र यासंदर्भात अद्याप आणखी संशोधन सुरू आहे. ग्रीन टी रोज किंवा त्याहून अधिक प्यायल्याने यकृताचे कार्य करणे कठीण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

जास्त ग्रीन टी प्यायल्याने होणारे नुकसान :

जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने आपल्या आरोग्याचे इतरही नुकसान होऊ शकते. ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे ॲसिडीटी, मिनरल्सची कमतरता निर्माण होणे, डिहायड्रेशन, कॅफेन ओव्हरडोस, अशक्तपणा, पोटासंदर्भातील समस्या उद्भवणे, असा त्रास होऊ शकतो. म्हणूनच, जर तुम्हीही ग्रीन टीचे शौकीन असेल तरीही एका ठराविक प्रमाणातच ग्रीन टीचे सेवन करा.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.