AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅड कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवायची असेल तर आहारात करा ‘या’ सीझनल भाज्यांचा समावेश

जर तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचं असेल तर तुम्ही या 4 हंगामी भाज्या नियमितपणे खाण्याची सवय लावा. यामध्ये असलेले गुणधर्म कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात.

बॅड कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवायची असेल तर आहारात करा 'या' सीझनल भाज्यांचा समावेश
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 23, 2023 | 3:00 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही दशकांमध्ये आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये मोठा (lifestyle) बदल झाला आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतेक लोक घरात आणि स्वयंपाकघरात फार कमी वेळ घालवतात. कुकीज, मेयॉनीज आणि चटकदार खाणं यांसारख्या पॅकबंद आणि ट्रान्स फॅट (fats) असलेले पदार्थ खाण्याचे लोकांना आपल्याला व्यसन लागले आहे. अशा गोष्टी खायला चविष्ट असतात, पण त्यांच्यामुळे शरीरात चरबी वाढते आणि हळूहळू कोलेस्ट्रॉलची (cholesterol) पातळी वाढू लागते. सामन्यतः कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकारचे असते एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल अर्थात HDL आणि दुसरे खराब कोलेस्ट्रॉल अर्थात LDL. पण खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकाराच्या झटक्यासारखी जीवघेणी स्थितीही उद्भवू शकते. हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे आधीच हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

ताजी हवा आणि पाणी उपलब्ध नसतानाही, स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि चांगल्या आहाराचा नियम पाळला पाहिजे. जर तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचं असेल तर तुम्ही या 4 हंगामी भाज्या नियमितपणे खाण्याची सवय लावा. यामध्ये असलेले गुणधर्म कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात.

पालक

व्हिटॅमिन ए, के आणि सी व्यतिरिक्त, लोह देखील हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळते. अशक्तपणा बरा करण्यासाठी लोहाची गरज असते आणि पालकापेक्षा त्याचा चांगला स्रोत कोणता असू शकतो. पालक प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध असतो. खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी त्याचे नियमितपणे सेवन करावे.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये उच्च फायबर, व्हिटॅमिन सी आणि हाडे मजबूत करणारे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तुम्ही ब्रोकोली शिजवून खाऊ शकता किंवा कच्ची सेवन करू शकता. अथवा त्याचे सूपही पिऊ शकता.

बीट

बीटाच्या भाजीमध्ये दोन प्रकारचे विद्रव्य आणि अघुलनशील तंतू आढळतात जे शरीरात रक्त वेगाने वाढवतात. यासोबतच हे नायट्रेटचाही चांगला स्रोत आहे, जो शरीराचा रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. बीटरूट सलाडमध्ये समाविष्ट करून खाणे चांगले. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.

कारले

कडू चवीची ही भाजी मधुमेहाचा शत्रू मानली जाते. कारण ही भाजी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे. यासोबतच हृदयाचे आरोग्यही राखता येते. हे खराब कोलेस्ट्रॉल आणि साखर पातळी दोन्ही कमी करण्यास सक्षम आहे. हे रस आणि भाजीच्या स्वरूपात देखील सेवन केले जाऊ शकते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.