मासिक पाळीच्या काळात दही खाताय?, जाणून घ्या फायद्याचे आहे की नुकसानदायक!

मासिक पाळीच्या काळात अनेकदा घरातील वयोवृध्द महिला दही न खाण्याचा सल्ला देतात, परंतु तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीदरम्यान दही खाणे हे आरोग्यदायी आहे.

मासिक पाळीच्या काळात दही खाताय?, जाणून घ्या फायद्याचे आहे की नुकसानदायक!
दही
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 12:14 AM

अनेकदा आपल्या घरातील ज्येष्ठ वयोवृद्ध महिला मासिक पाळीच्या (Periods) दरम्यान दही (Curd) न खाण्याचा सल्ला देताना तुम्ही अनेकदा ऐकले असेल खरंतर मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक हार्मोन्स बदल ( Hormonal Changes) होत असतात यामुळे अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते, जसे की गर्भाशयाचा आकार लहान होणे ,सूज व अन्य समस्या अशा परिस्थितीमध्ये थंड आणि आंबट पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.असे म्हटले जाते की, जर आपण आंबट पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये सूज अजून वाढते. दही शीत प्रवृत्तीची असल्याने व चवीला आंबट असल्याने अनेकदा सर्दी खोकला तसेच कफ संदर्भातली समस्या होण्याची शक्यता असते परंतु जर आपण तज्ज्ञ मंडळींच्या मतांचा अभ्यास केला तर ते दही खाण्याचा सल्ला देतात.

दह्याबाबत गैरसमज

तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीदरम्यान दही न खाणे ही एक फक्त अंधश्रद्धा आहे. वास्तविकतेमध्ये पाहायला गेल्यास दह्यामध्ये  प्रोबायोटिक असतात, जे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. मासिक पाळीच्या दरम्यान जर खाल्ल्यास मांस पेशींमधील वेदना आणि सूज सुद्धा कमी होते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमची मात्रा असते अशातच जर तुम्हाला हाडांसंबधित कोणतेही आजार असतील, हाडांमधून कट कट आवाज येत असेल, हाडांमध्ये वेदना जाणवत असतील तर या सगळ्या समस्या सुद्धा दह्याच्या नियमित सेवनाने दूर होतात. दह्यामध्ये  असे काही औषधी गुणधर्म असतात जे तुमची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात, म्हणूनच ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तीने सुद्धा आपल्या आहारामध्ये दह्याचा समावेश अवश्‍य करायला हवा

रात्री चुकून सुद्धा खाऊ नये दही

दही नेहमी दिवसा खायला हवे चुकून सुद्धा दही रात्रीच्या वेळी खाऊ नका परंतु हा नियम फक्त मासिक पाळीच्या दिवसांमध्येच आपल्याला पाळायचा नाही तर अन्य दिवसांमध्ये सुद्धा दही सेवन करण्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसे पाहायला गेले तर दह्यामध्ये शितप्रवृत्तीचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच अशा वेळी जर आपण रात्री दही खाल्ले तर आपल्याला सर्दी खोकला सुद्धा होऊ शकतो, तसेच शरीरामध्ये पित्त आणि कफ संदर्भातील अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे दह्याचे सेवन केवळ दिवसा करावे.

मासिक पाळीदरम्यान या पदार्थांचे सेवन टाळा

खरेतर मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा पोषक तत्वांची कमतरता भासते, अशातच महिलांना जास्तीत जास्त लोह, कॅल्शियम आणि अन्य पोषक तत्व युक्त आहाराची गरज असते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान पालेभाज्यांच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. मात्र पाळीदरम्यान अति मसालेदार, खारट आणि अति प्रमाणात कॉफीचे सेवन तसेच प्रक्रिया केलेले फॅटी अन्नपदार्थ टाळावेत.

टीप : वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. तुमचा डायट प्लॅन ठरवताना एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

ज्या आजारामुळे बप्पी लाहिरींनी जीव गमावला त्याची लक्षणे माहितीय का?

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!

पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! चुटकीसरशी दुखणं गायब करणारा उपाय

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.