हिवाळ्यात मेथीची भाजी खाणे ठरेल फायदेशीर, वजन कमी करण्यासोबतच शरीर राहील उबदार
मेथीची भाजी खाल्याने हिवाळ्यात शरीर उबदार तर राहतेच याशिवाय अनेक आजारांपासून देखील संरक्षण मिळते. डॉक्टरांच्या मते त्यात लोह, मॅग्नीज, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगपरतिकारकशक्ती देखील वाढते.
मेथीचे पराठे बनवणे असो किंवा विविध प्रकारच्या भाज्या हिवाळ्यात प्रत्येक घरात मेथीच्या भाजीची मागणी वाढते. चवीबद्दल बोलायचे असेल तर ते त्यांच्या सौम्य कडू चवीसाठी प्रसिद्ध आहे. असे असून देखील हिवाळ्यात मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. आयुर्वेदापासून आधुनिक वैद्यकीय शास्त्रापर्यंत मेथीच्या हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अमृत समान मानल्या जातात. यामध्ये मिळणाऱ्या पोषक तत्वांमुळे हिवाळ्यात शरीर उबदार तर राहतेच याशिवाय अनेक आजारांपासून देखील संरक्षण मिळते. डॉक्टरांच्या मते त्यात लोह, मॅग्नीज, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जाणून घेऊया मेथीच्या भाजीचे फायदे…
त्वचा निरोगी ठेवते
मेथीच्या भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे त्वचेला मुलायम आणि चमकदार तसेच सुंदर बनवण्यास मदत करतात. अशा प्रकारे हे निरोगी त्वचेसाठी औषधासारखे काम करते.
सूज कमी करते
मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यास मदत करतात. तथापि यावर कोणतेही संशोधन आतापर्यंत झाले नाही.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम असते. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते आणि बदलत्या ऋतूंमध्ये आपल्याला निरोगी ठेवू शकते.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवते
एका संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुम्ही तुमच्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केला तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते. ज्यामुळे तुम्हाला टाईप 2 मधुमेहाच्या समस्येपासून वाचता येवू शकते.
शरीरात उष्णता निर्माण करते
मेथीची भाजी शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. थंडीच्या दिवसात मेथीच्या भाजीचे सेवन केल्याने शरीराचे थंडीपासून संरक्षण होते आणि नैसर्गिक रित्या उबदार वाटते.
वजन कमी करते
मेथीची भाजी वजन कमी करण्यात खूप मदत करते. असे संशोधनात आढळून आले आहे जर तुम्ही नियमितपणे मेथीच्या भाजीचे सेवन केले तर ते 17 टक्क्यांपर्यंत चरबी कमी करण्याचं काम करते.