Beard Hair Loss: दाढीचे केस का गळतात ? जाणून घ्या केसगळती रोखण्याचे सोपे उपाय

दाढी-मिशीचे केस गळण्याचा त्रास अनेक कारणांमुळे होऊ शकतो. जाणून घ्या यामागचे नेमके कारण आणि ते रोखण्याचा उपाय.

Beard Hair Loss: दाढीचे केस का गळतात ? जाणून घ्या केसगळती रोखण्याचे सोपे उपाय
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 1:45 PM

आजच्या काळात पुरूषांची दाढी-मिशी (Beard) हे स्टाइल स्टेटमेंट (style statement) बनले आहे. वाढलेली दाढी आणि नीट सेट केलेली मिशी, ही पुरुषांची शान बनली आहे. दाढी-मिशीची फॅशन सध्या इतकी वाढली आहे की आजकाल प्रत्येक व्यक्ती दाढी-मिशीबाबत सतर्क राहताना दिसते. मात्र आजकाला खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यस्त जीवनशैली या कारणांमुळे बऱ्याच जणांच्या दाढीचे केस गळण्याची (beard hair loss problem) समस्या खूप वाढली आहे. दाढीचे केस गळत असल्यास या समस्येचा तुमच्या व्यक्तिमत्वावरही परिणाम होताना दिसतो. शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असल्यास दाढी-मिशीचे केस गळू शकतात. एकीकडे सर्वज जण दाढीची नवी स्टाईल करण्यात, फॅशन फॉलो करताना दिसत आहेत. तर काही जण दाढीचे केस गळल्यामुळे मानसिकरित्याही त्रासलेले दिसतात. वाढत्या वयानुसार दाढीचे केस गळणे किंवा ते पांढरे होणे ही सामान्य समस्या आहे. मात्र कमी वयातच तुम्हाला हा त्रास सहन करावा लागत असल्यास योग्य काळजी घेणे (care) गरजेचे आहे.

दाढीचे केस का गळतात ?

दाढी किंवा मिशीचे केस गळण्याच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात. काही लोकांना हा त्रास खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच ताण-तणावाच्या जीवनामुळे होऊ शकतो. तर काही लोकांना आजारामुळे किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे हे सहन करावे लागते. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे तसेच केमोथेरपीमुळे केस गळू शकतात. त्यामुळे दाढीचे केसही गळतात.

दाढीचे केस गळण्याची काही प्रमुख कारणे आहेत –

– अनुवांशिक कारणांमुळे दाढीचे केस गळतात. – फंगल इन्फेक्शनमुळे -टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमतरतेमुळे – केमोथेरपी मुळे – ऑटोइम्युन आजारांमुळे – प्रथिनांची कमतरता असल्यास दाढीचे केस गळू शकतात – शरीरात झिंकचे (जस्त) प्रमाण कमी असल्यास – नीट स्वच्छता न राखल्यामुळे

दाढी-मिशीची केसगळती रोखण्याचे उपाय –

दाढी किंवा मिशीचे केस गळण्याच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात. शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असेल तर दाढी- मिशीचे केस वेगाने गळतात. तुम्हालाही त्रास होत असेल तर सर्वप्रथम खाण्या-पिण्याच्या सवयी सुधारा. जीवनशैलीतील काही सवयीही केस गळण्यास कारणीभूत ठरतात. दाढी किंवा मिशीचे केस गळणे रोखायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घ्या.

– पुरेशा प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करा. – डाएटमध्ये आवळ्याचा समावेश करा, तो आरोग्यासाठी व केसांसाठी चांगला असतो. – आवळा किंवा नारळ तेलाने दाढी-मिशीच्या केसांना मालिश करा. – मोहरीचे तेल घेऊन हलक्या हाताने दाढी-मिशीच्या केसांना लावावे. – शरीरातील झिंकची कमतरता दूर करण्यासाठी सुकामेवा खा. – गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.