Feet Pain In The Morning: सकाळी उठताच टाच दुखते ? असू शकते ‘हे’ मोठे कारण, करून पहा घरगुती उपाय
सकाळी उठल्यावर अनेक लोकांना टाचांमध्ये वेदना जाणवतात. हे नक्की का होतं व त्यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसांत अनेक लोकांना सकाळी उठल्यावर टाचांमध्ये (feet pain) खूप वेदना होतात. अनेक लोक हा त्रास होत असल्याची तक्रार करतात, आणि या वेदना (pain) एवढ्या तीव्र असतात की, काही वेळेस पाय जमिनीवर टेकवणेही शक्य होत नाही. टाचांमधील वेदना आपोआप ठीक होत नाहीत, तरी अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या वेदना नेमक्या कशामुळे होतात, टाच का दुखते आणि त्यावर काय उपाय (home remedies) करता येतील हे जाणून घेऊया.
या कारणांमुळे दुखू शकते टाच
प्लांटर फेशिआयटिस
प्लांटर फेशिआयटिस ही एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये पायाच्या लिगामेंट्सना सूज येते किंवा लालसरपणा येतो. जेव्हा काही कारणामुळे पायाची टाच आणि बोटं यांना जोडणारी लिगामेंट सुजते तेव्हा हा प्लांटर फेशिआयटिसचा त्रास होतो. याचा त्रास संबंधित व्यक्तीला सकाळी जास्त जाणवू शकतो.
अचिलिस टेंडनिटिस
अचिलिस टेंडनिटिस हे टिश्यूजचे असे बंडल असते जे स्नायूंना टाचांच्या हाडांशी जोडते. जेव्हा या टिश्यूजना सूज येते तेव्हा टाचांमध्ये वेदना होऊ शकते. त्याची लक्षणे सकाळी जास्त जाणवतात कारण शरीराच्या या भागात रक्ताभिसरण खूप कमी होऊ शकते.
रूमेटाइड आर्थ्रायटिस
रूमेटाइड आर्थ्रायटिस असणाऱ्या लोकांमध्ये प्लांटर फेशिआयटिसचा धोका वाढतो, त्यामुळे सकाळी उठल्यावर टाचांमध्ये वेदना होऊ शकतात. काही घरगुती उपायांनी हा त्रास नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
स्ट्रेस फ्रॅक्चर
पायांची अती हालचाल , एखादी चुकीची मूव्हमेंट किंवा अती व्यायाम केल्याने टाचेत स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ शकते. ही स्थिती उद्भवल्यास काही काळ सूज येऊ शकते तसेच चालायलाही त्रास होऊ शकतो. या वेदना काही दिवस किंवा काही आठवडे राहू शकतात.
टाचांमधील वेदना कमी करण्यास उपाय
वेदना कमी करण्यासाठी बर्फ लावल्याने आराम मिळत असला, तरी दीर्घकाळ वेदनाराहिल्यास त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. पण याआधी सकाळी उठल्याबरोबर टाच का दुखते हे जाणून घेणं गरजेचं आहे.
– बर्फाने शेकावे.
– मसाज करावा
– स्ट्रेचिंगचा व्यायाम करावा
– डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध लावावे
– टाचेला बँडेज बांधू शकता.