Acidity Problem: ॲसिडिटीच्या समस्येमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो
Acidity Problem: सकाळी उठल्यानंतर पोटात ॲसिडिटी होणे ही सामान्य समस्या आहे. सकाळी उठल्यावर होणाऱ्या ॲसिडिटीमुळे तुम्ही दिवसभर हैराण होतात. चला तर जाणून घेऊया ॲसिडिटीचा त्रास दूर करण्यासाठी काय घरगुती उपाय केले पाहिजेल.

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे रात्रीचे जेवण वेळेवर होत नाही. उशीरा जेवल्यामुळे तुम्हाला पोटा संबंधीत अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. सकाळी उठल्यावर अनेकवेळा पोटदुखी आणि ॲसिडिटीच्या समस्या आजकाल सामान्य समस्या उद्भवू शकतात. सकाळी अॅसिडिटी झाल्यामुळे दिवसभर त्रास होतो. ॲसिडिटीचा त्रास अनेकवेळा चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे होऊ शकतात. व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला मानसिक तणाव होतो. ॲसिडिटी दूर करण्यासाठी अनेकजण औषध खातात. परंतु जास्त प्रमाणात औषध खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम आणि प्रोटिन या पोषक घटकांचा समावेश करावा. निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम केल्यास मदत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काही घरगुती उपाय करून ॲसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते.
लिंबू आणि आले :- सकाळी उठल्यावर लिंबाचा रस आणि आल्याचा तुकडा ग्लासभर पाण्यात मिसळून प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो. लिंबाचा रस आणि आल्याचा तुकडा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.




आवळ्याचा रस :- आवळ्यामध्ये नैसर्गिक अँटासिड आढळते ज्यामुळे तुमच्या शरीरातील ॲसिडिटीपासून आराम मिळतो. सकाळी उठल्यावर आवळा रस किंवा आवळ्याच्या गोळ्यांचे सेवन करा. तुम्ही आवळ्याचे तुकडे गरम पाण्याच्या बाटलीत ठेवा आणि दिवसभर प्या. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
दही :- सकाळी उठल्यावर तुम्ही जर दहीचे सेवन केले तर तुम्हाला ॲसिडिटीच्या समस्या होत नाही. दहीमध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. दही खाल्ल्यामुळे तुमच्या पोटामधील उष्णता कामी होण्यास मदत होते.
पुदीना :- पुदीना तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. पुदीन्यामध्ये नैसर्गिक अँटासिड असते ज्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीपासून आराम मिळतो. तुम्ही पुदिन्याच्या पानांचा रस किंवा पुदिन्याचा चहा पिऊ शकता.
नारळ पाणी :- नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे ॲसिडिटीपासून आराम मिळण्यास मदत होते. तुम्ही दिवसभरात कधीही नारळाचे पाणी पिऊ शकता यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
व्यायाम :- नियमित व्यायाम केल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. व्यायाम केल्यास तुमच्या शरीराला योग्य वळण मिळतं आणि तुमच्या पोटाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.